Harmanpreet Kaur
Harmanpreet Kaur Dainik Gomantak
Image Story

Harmanpreet Kaur @35: बर्थडे गर्ल हरमनप्रीतबद्दल 'या' खास 5 गोष्टी माहिती आहेत का?

Pranali Kodre

Harmanpreet Kaur Birthday:

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जाते. तिच्याकडे फक्त फलंदाजीच नाही, तर गरज पडेल तेव्हा गोलंदाजी करण्याचीही क्षमता आहे. दरम्यान, ती तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने तिच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

हरमनप्रीतचे कुटुंब

Harmanpreet Kaur

हरमनप्रीतचा जन्म पंजाबमधील मोगा येथे 8 मार्च 1989 रोजी झाला. तिचे वडील हरमनदर सिंग भुल्लर हे व्हॉलिबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू होते. तसेच तिची धाकटी बहीण हेमजीत ही मोगामधील एका कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. हरमनप्रीतला दोन भाऊही असून तिची आई गृहिणी आहे.

क्रिकेटसाठी 30 किमी प्रवास

Harmanpreet Kaur

हरमनप्रीतला लहानपणापासूनच क्रिकेटची ओढ होती. त्यामुळे तिने मोगामधील तिच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ग्यान ज्योती स्कुल ऍकेडमीमध्ये प्रवेळ घेतला होता. तिथे तिने कमलधीश सिंग सोधी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले.

त्यानंतर तिने विविध वयोगटातील क्रिकेट खेळले, तसेच पंजाबच्या वरिष्ठ संघातही जागा मिळाली. तिच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीमुळे तिने 2009 मध्येच 20 व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवले होते.

आंतरराष्ट्रीय पदार्पण

Harmanpreet Kaur

विशेष म्हणजे हरमनप्रीतने तिचा 20 वा वाढदिवस साजरा करण्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2009 सालच्या वनडे वर्ल्डकपमध्ये तिने 7 मार्च रोजी हे पदार्पण केले होते.

पण तिला या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण तिने गोलंदाजी करताना 4 षटकात 10 धावा दिल्या होत्या. त्याचवर्षी तिने जूनमध्ये आतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

दरम्यान, हरमनप्रीतसाठी कसोटी पदार्पण मात्र फारसे खास ठरले नाही. तिने 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण ती पहिल्याच कसोटीत एका डावात 9 धावा आणि दुसऱ्या डावात शुन्यावर बाद झाली.

सेहवागची फॅन

Harmanpreet Kaur

हरमनप्रीत कौर सुरुवातीपासून भारताचा दिग्गज सलामीवीर विरेंद्र सहवागची मोठी चाहती राहिली आहे.

पहिल्यांदा नेतृत्व

Harmanpreet Kaur

हरमनप्रीत सध्या जरी भारतीय संघाची नियमित कर्णधार असली, तरी तिने भारतीय संघाचे सर्वात पहिल्यांदा 2012 सालीच नेतृत्व केले होते. त्यावेळी महिला आशिया चषकादरम्यान तात्कालिन भारतीय कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार झुलन गोस्वामी दुखापतग्रस्त झाल्या होत्या.

त्यामुळे हरमनप्रीतकडे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यावेळी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला 18 धावांनी अंतिम सामन्यात पराभूत करत आशिया चषक जिंकला होता.

परदेशी लीग खेळणारी पहिली भारतीय

Harmanpreet Kaur

परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणारी हरमनप्रीत पहिला भारतीय क्रिकेटपटूही आहे. तिला 2016 साली बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स संघाने करारबद्ध केले होते. त्यामुळे बीबीएलमध्ये करारबद्ध होणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली. ती इंग्लंडमधील किया सुपर लीगमध्येही करार करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.

मुंबई इंडियन्समध्ये सामील

Harmanpreet Kaur

हरमनप्रीत कौरला आता पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामील करून घेतले आहे. त्यांनी तिला लिलावात 1 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केले. तिच्याकडे मुंबईने कर्णधारपदही सोपवले.

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

Harmanpreet Kaur

हरमनप्रीतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून 131 धावा केल्या आहेत आणि 11 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 130 वनडेत 3410 धावा आणि 31 विकेट्स घेतल्या आहेत.

तिने 161 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून ती सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारतीय क्रिकेटपटूही आहे. तिने 161 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 3204 धावा केल्या असून 32 विकेट्स घेतल्या आहेत.

तिने 2017 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये 171 धावांची खेळी केली होती. त्यामुळे ती महिला वनडे वर्ल्डकपमध्ये बाद फेरीत सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारी क्रिकेटपटू ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT