Adil Rashid Dainik Gomantak
Image Story

IND vs ENG: इंग्लिश गोलंदाजाला सुवर्णसंधी! भारताविरुद्ध 'इतक्या' विकेट्स घेवून करु शकतो मोठा पराक्रम

Manish Jadhav
England

भारत आणि इंग्लंड

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यासाठी फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. तत्पूर्वी, टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

england

एकदिवसीय मालिका

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये खेळला जाईल. यानंतर, दोन्ही संघ 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये दुसरा सामना खेळतील. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यानंतर फक्त एक आठवडा, 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची सुरुवात होईल. अशा परिस्थितीत, तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी एकदिवसीय मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.

Varun

वरुण चक्रवर्ती

या मालिकेत भारत आणि इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कारण यजमान संघ भारताने अचानक वरुण चक्रवर्तीचा संघात समावेश करण्याची घोषणा करुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. चक्रवर्तीने नुकत्याच झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लिश फलंदाजांना गारद केले. मालिकेत त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

Adil Rashid

इंग्लिश गोलंदाजासाठी सुवर्णसंधी

सर्वांच्या नजरा इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदवर असतील कारण त्याने टी20 मालिकेत 5 बळी घेतले असले तरी तो खूपच किफायतशीर होता. राजकोटमधील इंग्लंडच्या एकमेव विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना रशीदविरुद्ध सावधगिरीने खेळावे लागेल.

england

मोठा टप्पा

आदिल रशीदला एकदिवसीय मालिकेत मोठा टप्पा गाठण्याची उत्तम संधी असेल. रशीदने 286 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 396 विकेट्स घेतल्या आहेत. जर त्याने एकदिवसीय मालिकेत 4 भारतीय फलंदाजांच्या विकेट घेतल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा 7वा इंग्लिश गोलंदाज बनेल. इंग्लंडसाठी आतापर्यंत फक्त 6 गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

SCROLL FOR NEXT