Rohit & Virat Dainik Gomantak
Image Story

ICC Rankings: आयसीसी क्रमवारी जाहीर! रोहित-विराटला फटका; प्रिन्स-श्रेयसला फायदा

Manish Jadhav
Rohit & Gill

आयसीसी क्रमवारी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे.

Rohit Sharma

रोहित शर्मा

कटकमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावले पण तरीही त्याला क्रमवारीत फटका बसला. परंतु त्याचा ओपनिंग साथीदार शुभमन गिलला थोडासा फायदा झाला आहे. सतत अपयशी ठरणाऱ्या विराट कोहलीच्या नशीबी पुन्हा एकदा निराशा आली. क्रमवारीत त्यालाही फटका बसला.

Rohit & Gill

रोहित शर्माची घसरण, गिलला फायदा

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याचे रेटिंग सध्या 786 आहे. पण आता त्याला भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल टक्कर देत आहे. शुभमन गिल आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे 781 रेटिंग गुण आहेत. गिलने सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली, त्याचा त्याला फायदा झाला. दरम्यान, क्रमवारीत रोहित शर्माची घसरण झाली आहे. तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे 773 रेटिंग गुण आहेत.

Virat Kohli

विराट कोहलीचीही घसरण

दरम्यान, युवा आयर्लंड खेळाडू हॅरी टेक्टर चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे 737 रेटिंग गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज हेनरिक क्लासेन 736 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीची खराब कामगिरी सुरुच आहे. तो आता सहाव्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे 728 रेटिंग गुण आहेत. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 721 रेटिंगसह 7व्या स्थानी तर वेस्ट इंडिजचा शाई होप 672 रेटिंगसह 8व्या स्थानी आहे.

Shreyas Iyer

श्रेयस अय्यर टॉप 10 मध्ये पोहोचला

अफगाणिस्तानच्या रहमानउल्लाह गुरबाजबद्दल बोलायचे झाल्यास, तो 672 रेटिंगसह शाई होपसह संयुक्तपणे 8व्या स्थानी आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरला क्रमवारीत फायदा झाला आहे. तो आता 669 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर पुन्हा एकदा क्रमवारीत बदल होईल . याचा अर्थ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी क्रमवारीत आणखी एक बदल होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT