8th Pay Commission: वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच झालेत रिटायर? मग जुन्या पगाराचा थकीत एरियर कसा मिळणार? जाणून घ्या नियम

8th Pay Commission Pension Revision For Pre 2026 Retirees: लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पेन्शनर्सच्या मनात सध्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न व संभ्रम निर्माण झाला आहे.
8th Pay Commission Pension Revision For Pre 2026 Retirees
8th Pay CommissionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

8th Pay Commission Pension Revision For Pre 2026 Retirees: लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पेन्शनर्सच्या मनात सध्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न व संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः, नवीन वेतन आयोगाची औपचारिक शिफारस लागू होण्यापूर्वीच जे कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांना वाढीव पगाराचा एरियर मिळणार का, याविषयी मोठी उत्सुकता व चिंता आहे.

सामान्य नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी (Employees) नवीन वेतन आयोगाची अंमलबजावणी अधिकृतपणे होण्यापूर्वीच निवृत्त झाला, तरीही त्याला एरियरचा लाभ मिळण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, जर एखादा कर्मचारी 2027 मध्ये सेवानिवृत्त झाला आणि सरकारने ही नवीन शिफारस मागील तारीख म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला, तर त्या कर्मचाऱ्याला 1 जानेवारी 2026 पासून ते त्याच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंतचा संपूर्ण फरक (एरियर) मिळण्यास पात्र ठरवले जाऊ शकते. हा एरियर त्याच्या जुन्या आणि सुधारित पगारातील तफावतीवर आधारित असेल.

8th Pay Commission Pension Revision For Pre 2026 Retirees
8th Pay Commission: सॅलरी इंक्रीमेंट की फिटमेंट फॅक्टर, कशात आहे कर्मचाऱ्यांचा खरा फायदा? जाणून घ्या नेमकं समीकरण

मात्र, या संपूर्ण प्रक्रियेची पात्रता पूर्णपणे केंद्र सरकारच्या अंतिम आदेशावर आणि ठरवून दिलेल्या पेमेन्टच्या अटींवर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे, आठव्या वेतन आयोगाच्या कक्षेत पेन्शनशी संबंधित मुद्द्यांची समीक्षा करणे देखील समाविष्ट असल्याने, जर सरकारने पेन्शन वाढवण्याबाबतच्या शिफारसी मंजूर केल्या, तर 1 जानेवारी 2026 पूर्वी आधीच निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील सुधारित पेन्शनचा थेट लाभ मिळू शकतो.

8th Pay Commission Pension Revision For Pre 2026 Retirees
8th Pay Commission Arrears: 12 महिन्यांची थकबाकी अन् खात्यात 5 लाखांहून अधिक रुपये! समजून घ्या संपूर्ण गणित

दरम्यान, या मुद्द्यावर निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी 'रिटायर्ड एंप्लॉयीज वेलफेयर असोसिएशन'ने सप्टेंबर 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पूर्वीच्या पेन्शनर्सना आणि फॅमिली पेन्शनर्सना यात स्पष्टपणे समाविष्ट करण्याची जोरदार मागणी केली. जुन्या पेन्शनर्सना केवळ निवृत्तीच्या तारखेमुळे नवीन आयोगाच्या फायद्यांपासून मुकावे लागण्याची भीती वाटत आहे. सध्याच्या घडीला जरी चित्र पूर्णपणे स्पष्ट नसले आणि सर्वकाही अंतिम शासकीय आदेशावर अवलंबून असले, तरी आगामी काळात येणाऱ्या निर्णयामुळे लाखो विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांचे लक्ष याकडे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

DA Merger With Basic Pay 25 Percent Rule
67 Percent Pension Demand 8th Pay Commission
8th Pay Commission
8th Pay Commission 1 year Completion Updates