वजन कमी करायचे असेल, तर योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील शिस्तबद्ध सवयी महत्त्वाच्या असतात. फॅड डायट्स किंवा क्रॅश डायट्सऐवजी नियमित आणि संतुलित पद्धतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी चांगले असते.
मध आणि लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. हे मिश्रण शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते, चयापचय (metabolism) सुधारते आणि पचनसंस्थेला डिटॉक्स करते. लिंबामध्ये विटामिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराचा मेटाबॉलिझम वाढवतात आणि चरबी जाळण्यास मदत करतात.
ओट्स, फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये (whole grains) यामुळे भूक कमी लागते आणि पचन सुधारते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, भूक कमी लागते आणि पचनसंस्था मजबूत राहते. जंक फूड खाणं टाळावं. बेकरीतील पदार्थ, तळलेले पदार्थ आणि साखरेचे सेवन कमी करा.
दररोज ३०-४५ मिनिटे चालणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा स्विमिंग करा. वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार, कपालभाती, भस्त्रिका आणि प्लँक व्यायाम हे वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. वजन उचलण्याचे व्यायाम केल्याने चरबी कमी होऊन स्नायू मजबूत होतात.
दररोज किमान ७-८ तास झोप आवश्यक आहे. झोप कमी झाल्यास वजन वाढते आणि हार्मोन्स असंतुलित होतात. ध्यान (Meditation), योगा किंवा संगीत ऐकल्याने तणाव कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
रात्री उशिरा खाणे टाळा. झोपण्याच्या २-३ तास आधी जेवण करा. दिवसातून ४-५ वेळा थोडे-थोडे खाल्ल्यास शरीर सतत ऊर्जावान राहते आणि चरबी वेगाने जळते. जास्त वेळ उपाशी राहिल्यास शरीर चरबी साठवते, त्यामुळे योग्य प्रमाणात आणि वेळेवर जेवण महत्त्वाचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.