Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पाचे आवडते मोदक गणेश चतुर्थीला सगळीकडे बनवले जातात. पण, गणेश चतुर्थीला तुम्ही फक्त मोदक तयार करून खाऊ शकता असे नाही तर इतरही अनेक पदार्थ आहेत ज्यांचा आस्वाद घेता येतो. यामध्ये पुरण पोळी, शीरा आणि पाटोळी इत्यादींचा समावेश आहे. गणेश चतुर्थीदरम्यान संपूर्ण कुटुंबासह तुम्हाला या काही पदार्थांचा आस्वाद घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ.
पाटोळी
गणेश चतुर्थीच्या वेळी गौरी पूजेसाठी पाटोळी बनवली जाते. पाटोळी बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा रोल करा आणि त्यात किसलेले खोबरे आणि गूळ टाकून ताज्या हळदीच्या पानात वाफेवर शिजवा.
पुरण पोळी
पुरण म्हणजे सारण तयार भरून तयार केलेली पोळी जी चवीला गोड असते. हरभरा डाळ, गूळ. वेलची आणि केशर टाकून सारण तयार केले जाते. जी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे.
नारळाचे लाडू
नारळाचे लाडू देखील चांगली मिठाई आहे. जी गणेश चतुर्थीच्या वेळी बनवायला देखील चांगली आहे. हे लाडू बनवण्यासाठी दूध, कंडेन्स्ड मिल्क आणि किसलेले खोबरे वापरता येते.
पायसम
पायसम हा खीर सारखाच पदार्थ आहे जो दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात तयार केला जातो. तो बनवण्यासाठी दुधात गूळ, नारळ आणि वेलची पावडर घातली जाते.
शीरा
हा एक प्रकारचा पारंपारिक हलवा आहे जो भरपूर सुका मेवा आणि तूप घालून शिजवला जातो. गणेश चतुर्थीच्या वेळी अनेकजण प्रसाद म्हणून शीरा वाटतात.
गुजिया
गुजिया हा एक उत्तर भारतीय गोड पदार्थ आहे जो सहसा होळीच्या वेळी तयार केला जातो. हा पदार्थ मैद्यापासून बनवला जातो, ज्यामध्ये खोबरे, ड्रायफ्रूट्स, रवा आणि साखर मिसळून तयार केला जातो आणि तेलात तळला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.