आषाढी एकादशीनिमित्त (Devshayani Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली CMO Maharashtra, Sakal Media Group
आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते पंढरपूर मधील विठ्ठल-रुख्मिणीचं मंदिर जे अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं दिसतं महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आलेएकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होतेप्रत्येक वर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशी ची पूजा कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाही काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत पार पडली वाखरी पालखी तळावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय, संत चांगावटेश्वर, विठ्ठल रुख्माई पालख्यांचे स्वागत सोमवारी करण्यात आले