गोव्याला जायचा प्लान करण्यापूर्वी नियोजन करावे. दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. येथील अनेक निसर्ग रम्य पर्यटकांचे मन मोहून घेते.कुठे कासव तर कुठे डॉल्फिन बघायला मिळतील. रात्रीच्या वेळी पार्टीचा आनंद घेवू शकता. अनेक समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात.
Dainik Gomantak
गोव्यामध्ये अनेक भव्य किल्ले आहेत. जे भव्यता प्रतिभा आणि गौरवशाली भूतकाळाचे उदाहरण आहे. पण गोव्यातील किल्ल्यांची विशेष बाब महणजे
येथील निसर्ग रम्य दृश्ये. 'दिल चाहता है' चित्रपटाच्या शूटिंगनंतर हा किल्ला खूप प्रसिद्ध झाला. हे एक जूने दीपगृह आहे आणि येथे काही दशकापूर्वी
बंद केलेले जेल देखील आहे. त्याचप्रमाणे आणखीही अनेक किल्ले इथे पाहायला मिळतील.
गोव्यामध्ये चर्चची कामरता नाही. गोव्यातील युनेस्कोच्याजागतिक वारसा स्थळापैकी एक बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च आहे, जिथे सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष ठेवलेले आहे. शिवाय येथे कैथेड्रल ऑफ सेंटा कैटरीना हे प्रसिद्ध चर्च आहे. जेव्हा तुम्ही समुद्रकिनारी फिरायला आणि पार्टी कारीला गोव्याला जायचा प्लन करत असाल तर इथली भव्य मंदिरे पाहायला विसरू नका. जसे, शांता दुर्गा मंदिर, महादेव मंदिर, चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर, ब्रह्मा मंदिर, सप्तकोटेश्वर मंदिर यासारखे अनेक मंदिरे पाहायला मिळतील.
गोव्यात गेल्यावर तुम्ही क्लब किंवा पबपासून दूर राहू शकजत नाही. येथे तुम्ही तुमच्या आवडत्या पेयासह गोव्यातील सर्वोत्तम नाइटक्लब आणि पबसह कॅसिनोचा आनद घेवू शकता. शिवाय तुम्ही वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी, बाइक राईड, गोवा म्युझियम, डॉल्फिन व्ह्यू, घृतसागर वॉटर फॉल्स,मसाज थेरपी आणि लोकल शॉपिंगचा आनंद घेवू शकता.