आषाढी सोहळा: आषाढी वारी सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अठरा लाखांहून अधिक वारकरी भाविक पंढरीत दाखल झाले.
चंद्रभागा नदी: आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी चंद्रभागा नदीच्या तीरावर आणि पंढरपूर नगरीत भक्तांचा महासागर लोटला आहे.
पवित्र स्नान: परंपरागत वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीचे स्नान, नगर प्रदक्षिणा करणेसाठी भल्या पहाटे पासून रांगा लावल्या.
CM एकनाथ शिंदेचे सपत्निक दर्शन: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह पत्निक श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा केली.
जनतेसाठी साकडे: मुख्यमंत्री शिंदे यांनी पूजेनंतर राज्यातील जनता सुखी समृद्ध राहू दे पुरेसा पाऊस होवू दे असे साकडे घातले.
रेकॉर्ड ब्रेक भाविक: यावर्षी वारी ही विक्रमी गर्दीची आहे, दरवर्षी दहा ते बारा लाख भाविक उपस्थित असतात यावेळी अठरा लाखाहून अधिक आहेत.
आरोग्य शिबिरे: आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने चार ठिकाणी महा आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून आत्तापर्यंत 8 लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
विठ्ठलभक्तांची पायीवारी: विठ्ठलनामाच्या गजरात डिचोलीतील वेगवेगळ्या भागातील शेकडो वारकऱ्यांची पायीवारी. वाळवंटी नदीकाठी भरलेल्या विठ्ठलभक्तांच्या मेळ्यात होणार सहभागी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.