Ambani Family Dainik Gomantak
Image Story

Photos: 50 वंचित जोडप्यांचो सामूहीक लग्न सुवाळो, अंबानी फामिलीन दिली मोठी देख

Manish Jadhav
Ambani Family

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आताही एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आहे.

Anant Ambani & Radhika Merchant

अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

Mass wedding ceremony

अंबानी कुटंबाने 2 जुलै रोजी ‘रिलायन्स कॉर्पोरेट पार्क’ येथे 50 वंचित जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तब्बल 800 हून अधिक लोकांनी या जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी हजेरी लावली.

Anant Ambani & Radhika Merchant

या सामूहिक विवाह सोहळ्याला मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली. सध्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

Nita Ambani

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये निता अंबानी आपले पती मुकेश अंबानी यांच्यासोबत मंत्रोच्चार करताना दिसल्या.

Gift

पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे 2 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजता सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी अंबानी कुटुंबासह पिरामल कुटुंबाने या जोडप्यांना भेटवस्तू आणि आशिर्वाद दिला.

Mukesh Ambani

अंबानी कुटुंबाने यावेळी प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, कानातले, नथ आणि दागीने दिले. एवढचं नाहीतर प्रत्येक जोडप्याला 1 लाख 1 हजाराचा चेकही दिला. याशिवाय, 36 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

Mukesh Ambani & Nita Ambani

'मानव सेवा हीच ईश्वर सेवा' हा विचार अंबानी कुटुंबाने नेहमीच जपला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कामातूनही याची प्रचिती येते.

Mukesh Ambani

विवाह सोहळ्याच्या शाही नियोजनानंतर अंबानी कुटुंबीयांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT