आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाने टॅक्स भरण्याच्या बाबतीत एक मोठा इतिहास रचला आहे. अदानी ग्रुपने जारी केलेल्या अहवालानुसार, 2024 या आर्थिक वर्षात 58 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त टॅक्स भरला आहे. याचा अर्थ असा की, समूहाने दर तासाला 6.63 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे.
अदानी समूहाच्या कंपन्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 46,610 कोटी रुपयांचे टॅक्स लोन चुकवले. याचा अर्थ असा की, मागील वर्षी अदानी ग्रुपने दर तासाला 5.३32 कोटी रुपयांचे लोन फेडले होते. चला तर मग अदानी ग्रुपने कोणत्या प्रकारचा अहवाल जारी केला आहे ते जाणून घेऊया...
अदानी समूहाने सांगितले की, भरलेल्या टॅक्समध्ये ग्लोबल टॅक्स, अदानी पोर्टफोलिओ कंपन्यांनी भरलेले शुल्क आणि इतर टॅक्स, अप्रत्यक्ष टॅक्स आणि इतर भागधारकांच्या वतीने गोळा केलेले आणि दिले जाणारे टॅक्स आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी सामाजिक सुरक्षा योगदान यांचा समावेश आहे. अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाने 2023-24 (एप्रिल, 2023 ते मार्च, 2024) या आर्थिक वर्षासाठीचा टॅक्स पारदर्शकता अहवाल प्रसिद्ध केला आहे. समूहाने त्यांच्या निवेदनात म्हटले की, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अदानी समूहाचे एकूण ग्लोबल टॅक्स आणि इतर योगदान 58,104.4 कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये त्यांच्या सूचीबद्ध युनिट्सच्या पोर्टफोलिओद्वारे 46,610.2 कोटी रुपयांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते.
समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांनी प्रकाशित केलेल्या स्वतंत्र अहवालांमध्ये तपशील दिले आहेत. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अंबुजा सिमेंट्स. या आकड्यामध्ये सात कंपन्यांपैकी तीन इतर सूचीबद्ध कंपन्यांनी- एनडीटीव्ही, एसीसी आणि सांघी इंडस्ट्रीजने टॅक्स भरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.