Weekly Horoscope 14 August to 24th August 2025 Dainik Gomantak
Horoscope

Weekly Horoscope: ऑगस्टचा हा आठवडा ठरणार 'लकी', 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक स्थितीत होणार मोठा बदल

Weekly Horoscope 14 August to 24th August 2025: एक नवीन आठवडा सुरू होणार आहे. तर हा आठवडा कोणासाठी चांगला असेल आणि कोणत्या राशींना जास्त काळजी घ्यावी लागेल?

Sameer Amunekar

एक नवीन आठवडा सुरू होणार आहे. तर हा आठवडा कोणासाठी चांगला असेल आणि कोणत्या राशींना जास्त काळजी घ्यावी लागेल? प्रसिद्ध ज्योतिषी चिराग बेजान दारूवाला यांच्याकडून या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

मेष
नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आणि दृढनिश्चयाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. प्रेम वाढेल. एकूणच, आठवडा तुमच्या प्रगतीसाठी शुभ आहे.

वृषभ
वैयक्तिक प्रगती व साहसाच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. दृढनिश्चयाने त्या साधा. प्रेमाच्या बाबतीत वातावरण रोमँटिक असेल आणि तुम्हाला त्याच्या आकर्षणापासून दूर राहता येणार नाही.

मिथुन
जोखीम घेण्याची ही योग्य वेळ आहे. नाविन्यपूर्ण कल्पना व सर्जनशील विचार तुम्हाला करिअरमध्ये वेगळं स्थान मिळवून देतील.

कर्क
तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि मनाच्या इच्छांचा पाठपुरावा करा. प्रेमाच्या बाबतीत रोमांचक प्रवास सुरू होईल. नातेसंबंध अधिक गहिरे होतील, तर अविवाहितांना हृदयाला भिडणारी खास भेट होऊ शकते.

सिंह
तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात इच्छा पूर्ण करण्याची ताकद आहे. वैयक्तिक जीवनात नातेसंबंधांवर लक्ष केंद्रीत राहील. प्रियजनांशी अर्थपूर्ण चर्चा व सखोल नाते जुळतील. नोकरीत यश मिळेल.

कन्या
आव्हानांना अचूकतेने व हुशारीने सामोरे जाण्याची तुमची वृत्ती हा तुमचा सर्वात मोठा गुण ठरेल. प्रेमाच्या बाबतीत वातावरण उत्साही आहे. आर्थिकदृष्ट्या भरभराट होईल.

तूळ
संवादातून वाद मिटवणे महत्त्वाचे ठरेल. शब्द विचारपूर्वक वापरा आणि इतरांचं नीट ऐका. कामाच्या ठिकाणी तुमचं राजनैतिक कौशल्य उपयोगी पडेल.

वृश्चिक
आत्मपरीक्षणाचा हा प्रवास स्वीकारा; यामुळे वैयक्तिक वाढ होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अंतर्ज्ञानाचा आधार घ्या. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिक संवाद साधा आणि गैरसमज टाळा.

धनु
तुमचा उत्साह व आत्मविश्वास इतरांना प्रेरणा देईल. पण खूप काम एकाच वेळी घेण्यापासून सावध रहा. आठवडा पुढे सरता सरता वेळ व ऊर्जेवरील मागणी वाढेल.

मकर
कामाशी संबंधित तणावाची शक्यता आहे. व्यावसायिक मागण्या आणि स्वतःची काळजी यांचा समतोल साधा. विश्रांती घेणं विसरू नका. या आठवड्यात संपन्नतेचे लाभ मिळतील.

कुंभ
सर्जनशीलतेचा हा सर्वोच्च टप्पा आहे. आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधता येतील. नातेसंबंधांमध्ये प्रियजनांशी अधिक घट्ट बंध जुळतील.

मीन
अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि कल्पनाशक्तीला वाव द्या. कलात्मक प्रयत्न, छंद किंवा समाधान देणाऱ्या क्रियाकलापांसाठी हा अनुकूल काळ आहे. आर्थिक बाबतीत आठवडा शुभ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

SCROLL FOR NEXT