Weekly Finance Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Weekly Finance Horoscope: खिशावर ठेवा ताबा! या आठवड्यात 'या' 4 राशींना बसणार आर्थिक फटका

Weekly Finance Horoscope 19th January to 25th January 2026: जानेवारी महिन्याचा हा नवीन आठवडा आर्थिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Sameer Amunekar

जानेवारी महिन्याचा हा नवीन आठवडा आर्थिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे काही राशींच्या नशिबात धनलाभाचे योग आहेत, तर काहींना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे. विशेषतः मेष आणि तुळ राशीच्या व्यक्तींनी गुंतवणुकीचे निर्णय घेताना गाफील राहून चालणार नाही. चला तर मग, सर्व १२ राशींसाठी हा आठवडा आर्थिक आघाडीवर कसा असेल, जाणून घेऊया.

बचत आणि नियोजनावर भर देणाऱ्या राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ कर्जमुक्तीसाठी उत्तम आहे. जर तुम्ही योग्य आर्थिक नियोजन केले, तर जुनी देणी फेडण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात नफा झाल्यामुळे विस्ताराच्या संधी मिळतील. 

मिथुन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात 'काटकसर' हा मंत्र लक्षात ठेवावा. अनावश्यक चैनीच्या वस्तूंवर खर्च टाळल्यास भविष्यातील आर्थिक ओढाताण कमी होईल. तसेच धनु राशीच्या लोकांनी मार्केटिंग क्षेत्रात गुंतवणूक केल्यास फायदा होईल, मात्र व्यावसायिक भागीदारांशी आर्थिक मुद्द्यावरून मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

आर्थिक सतर्कता आणि सल्लामसलत आवश्यक

मेष राशीच्या व्यक्तींना आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी येतील, मात्र आठवड्याच्या शेवटी आर्थिक प्रश्नांची चांगली उत्तरे मिळतील. तुळ राशीसाठी हा काळ घाईने निर्णय घेण्याचा नाही.

शक्य असल्यास एखाद्या अनुभवी आर्थिक सल्लागाराची मदत नक्की घ्या, जेणेकरून तुमचे भांडवल सुरक्षित राहील. कन्या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत नकारात्मक विचार करणे थांबवावे. कधीकधी अज्ञात कारणांमुळे मन अस्वस्थ राहू शकते, पण त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक ध्येयांवर होऊ देऊ नका.

उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद

सिंह राशीच्या जातकांना घरातल्या छोट्या समारंभांमुळे किंवा पार्ट्यांमुळे खिशाला कात्री बसू शकते, मात्र फॅशन उद्योगातील गुंतवणूकदारांना हा आठवडा फलदायी ठरेल. वृश्चिक राशीला आपल्या मोठ्या भावंडांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

प्रवास, विमा आणि शैक्षणिक शुल्कावर खर्च वाढू शकतो. मकर राशीसाठी आनंदाची बातमी म्हणजे, प्रलंबित असलेली देणी किंवा जुनी बिले वसूल होऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.

मानसिक शांती आणि अध्यात्मिक पाठबळ

मीन राशीच्या व्यक्तींनी कामाच्या व्यापामुळे किंवा पैशांच्या काळजीमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नये. ईश्वरावरील श्रद्धा तुम्हाला कठीण काळातून बाहेर काढण्यास मदत करेल. कुंभ राशीच्या लोकांनी स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा, मात्र सरकारी कामातून मोठी धनप्राप्ती होईल अशी अपेक्षा सध्या तरी ठेवू नये. कर्क राशीसाठी समर्पण आणि पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास कठीण आर्थिक आव्हानांवर मात करणे सोपे जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

SCROLL FOR NEXT