Weekly Career Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Weekly Career Horoscope: तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार! 'या' 3 राशींच्या नशिबाचे ग्रह उजळणार, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Weekly Career Horoscope 22nd September to 28th September 2025: नवीन आठवड्याची सुरुवात होत आहे. अशा वेळी मेष, वृषभ, मिथुनसह सर्व १२ राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे.

Sameer Amunekar

Weekly Career Horoscope 22nd September to 28th September 2025

नवीन आठवड्याची सुरुवात होत आहे. अशा वेळी मेष, वृषभ, मिथुनसह सर्व १२ राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे. प्रख्यात ज्योतिषी चिराग बेजान दारुवाला यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेऊ या, या आठवड्यात तुमच्या करिअर आणि शिक्षण क्षेत्रात कशी स्थिती राहणार आहे.

मेष
या आठवड्यात तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रीत करून शैक्षणिक कार्यात प्रगती करण्याची चांगली संधी आहे. जबाबदाऱ्या पूर्ण करत राहिल्यास करिअरशी संबंधित ध्येय साध्य करण्यात मदत होईल.

वृषभ
नवीन ज्ञान मिळवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. पुस्तके, ऑनलाइन कोर्सेस किंवा कार्यशाळांच्या माध्यमातून स्वतःची प्रगती घडवा. शिक्षण आणि भविष्यातील उद्दिष्टांवर लक्ष द्या.

मिथुन
शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य संतुलन राखल्यास ध्येय गाठताना ऊर्जा टिकवून ठेवता येईल.

कर्क
विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतात. करिअर क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील. काहींना इच्छित नोकरी मिळू शकते.

सिंह
नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरी मिळविण्याचे प्रयत्न यशस्वी ठरू शकतात.

कन्या
वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ. नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यास सक्षम होतील. स्पर्धा परीक्षांचे निकाल अनुकूल मिळू शकतात.

तुळ
नेतृत्व गुण दाखविण्याची संधी मिळेल. व्यस्त दिनक्रम असूनही काम अर्धवट सोडू नये.

वृश्चिक
स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ. आत्मविश्वास टिकवल्यास यश निश्चित मिळेल.

धनु
दृढनिश्चय व एकाग्रता वाढेल. स्वतःत सकारात्मक बदल घडविल्यास करिअरला गती मिळेल.

मकर
स्पर्धात्मक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यशाची संधी. परिश्रमाचे फळ मिळेल.

कुंभ
खेळाडू विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्यास यश मिळेल. मात्र आरोग्याकडे लक्ष द्यावे. विदेश प्रवासाची शक्यता आहे.

मीन
सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांत सहभागी झाल्यास आत्मविश्वास वाढेल व चारित्र्य घडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

Ravichandran Ashwin BBL: रविचंद्रन अश्विन 'बिग बॅश लीग'मध्ये खेळणार, 'या' संघाकडून मैदानात उतरणार; 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय

Salman Khan: बॉलिवूडचा सल्लूभाई म्हणतो, 'एक दिवस मलाही मुलं होतील'

Viral Video: लव्ह, फन आणि ताकद! नवऱ्यांना उचलून बायकांनी लावली आगळीवेगळी शर्यत, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

SCROLL FOR NEXT