Rashi Bhavishya | Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya: नशीब सोन्यासारखं चकाकणार! 'या' राशींनी रहा तयार; शुभकाळाची होणार सुरुवात

4 February Horoscope: बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ हा दिवस सर्वच राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार काही राशींना आज आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

Sameer Panditrao

बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ हा दिवस सर्वच राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार काही राशींना आज आर्थिक लाभाचे संकेत आहेत, तर काहींनी आरोग्य व नातेसंबंधांबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामकाज, कुटुंब, प्रेम आणि आरोग्य अशा सर्वच आघाड्यांवर आजचा दिवस काय सांगतो, ते पाहूया.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरेल. मित्र-नातेवाइकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. समाजोपयोगी कार्यात सहभाग वाढेल. प्रेमसंबंधात समजूतदारपणा राहील.

वृषभ राशीच्या व्यक्तींनी कुटुंबातील तणाव दूर करण्यासाठी ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.

मिथुन राशीला अनपेक्षित लाभ मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक संतुलन राखता येईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीची भेट उत्साह वाढवणारी ठरेल.

कर्क राशीच्या लोकांनी कोणालाही सल्ला देताना विचारपूर्वक बोलावे. आर्थिक बाजू मजबूत राहील. धार्मिक कार्यात मन रमू शकते.

सिंह राशीला सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. मात्र पोटदुखी किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आहारावर लक्ष द्या.

कन्या राशीच्या व्यक्तींनी कामात हलगर्जीपणा टाळावा. कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

तूळ राशीसाठी व्यवसाय व शिक्षणात प्रगतीचे संकेत आहेत. बोलण्यात सौम्यता ठेवल्यास वाद टळतील.

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र उधारी देणे टाळावे. दांपत्य जीवनात संयम आवश्यक आहे.

धनु राशीसाठी नोकरी व करिअरमध्ये नवे पर्याय उपलब्ध होतील. गुंतवणूक करताना घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या.

मकर राशीला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात. व्यावसायिक बदल फायदेशीर ठरतील.

कुंभ राशीच्या लोकांनी कागदपत्रांची नीट तपासणी करावी. कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता आहे.

मीन राशीसाठी संध्याकाळी शुभ बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात पुढील टप्प्याची चर्चा होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT