Financial Loss Astrology Prediction Dainik Gomantak
Horoscope

Vyatipat Yog: होळीनंतर 3 राशींना 'व्यतिपात' योगाचा फटका! सूर्य-चंद्राची युती ठरणार भारी; आर्थिक नुकसानीचे संकेत

Financial Loss Astrology Prediction: सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ मानसिक तणाव वाढवणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदाऱ्यांचे ओझे वाढल्याने तुम्ही दबावाखाली येऊ शकता.

Manish Jadhav

Vyatipat Yoga February 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये व्यतिपात योग हा अत्यंत संवेदनशील आणि शक्तिशाली मानला जातो. जेव्हा सूर्य आणि चंद्रमा एकमेकांपासून 180 अंशांच्या अंतरावर म्हणजेच परस्पर विरुद्ध राशींमध्ये स्थित असतात, तेव्हा या योगाची निर्मिती होते. या काळात ग्रहांची ऊर्जा अत्यंत तीव्र असते, ज्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो.

पंचांगानुसार, येत्या शनिवारी, 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 03:05 वाजल्यापासून हा व्यतिपात योग सुरु होत असून ज्योतिषाचार्य हर्षवर्द्धन शांडिल्य यांच्या मते, हा योग काही राशींसाठी अशुभ ठरु शकतो. विशेषतः तीन राशींच्या जातकांनी या काळात अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे, अन्यथा धनहानी, आरोग्य (Health) बिघडणे, नात्यांमधील दुरावा किंवा अपघातासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ मानसिक तणाव वाढवणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदाऱ्यांचे ओझे वाढल्याने तुम्ही दबावाखाली येऊ शकता. वरिष्ठांशी होणारे मतभेद टाळणे हिताचे राहील, कारण तुमची एक छोटीशी चूक मोठ्या संकटाचे रुप घेऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये कोणताही धोका पत्करणे महागात पडू शकते, त्यामुळे नवीन गुंतवणूक सध्या टाळलेलीच बरी.

जुन्या आर्थिक व्यवहारांवरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर अहंकाराचा मुद्दा पुढे आल्याने वादावादी होऊ शकते, ज्यामुळे जोडीदारासोबत गैरसमज वाढतील. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ किंवा प्रचंड थकवा जाणवेल. वाहन चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे असून संयम बाळगणे हाच या काळातील सर्वोत्तम उपाय आहे.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यतिपात योग भावनिक असंतुलन घेऊन येणार आहे. स्वभावात चिडचिडेपणा वाढल्यामुळे जवळच्या व्यक्तींशी खटके उडू शकतात, ज्यामुळे नात्यात दुरावा येण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होऊन तुमच्या योजनांमध्ये अडथळे आणू शकतात.

जर तुम्ही विचार न करता खर्च केलात, तर मोठी धनहानी होण्याचे संकेत आहेत. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर पोटाचे विकार किंवा रक्तदाबाचा त्रास सतावू शकतो. प्रवासात सतर्क राहणे अत्यंत आवश्यक असून कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळणे तुमच्या फायद्याचे ठरेल. या कठीण काळात धैर्य राखणे आणि मौन बाळगणे हे तुमच्यासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करेल.

कुंभ राशीच्या जातकांना या काळात मानसिक अस्थिरता आणि दबावाचा सामना करावा लागेल. कामातील एकाग्रता कमी झाल्यामुळे चुका होण्याची शक्यता असल्याने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना दोनदा विचार करावा. मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत किरकोळ कारणावरुन गैरसमज निर्माण होऊ शकतात. आर्थिक आघाडीवर अचानक खर्च वाढल्याने बजेट कोलमडू शकते, त्यामुळे कोणालाही उधार देणे टाळावे.

घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यामुळे तुमची चिंता वाढू शकते, ज्याचा परिणाम तुमच्या झोपेवर आणि मानसिक स्वास्थ्यावर होईल. जुनी प्रकरणे पुन्हा उफाळून आल्याने तणाव वाढू शकतो. वाहन किंवा यंत्रसामग्रीशी संबंधित कामे करताना पूर्णपणे सावध राहावे. शांत चित्ताने परिस्थिती हाताळणे आणि वादग्रस्त लोकांपासून दूर राहणे हेच तुमच्यासाठी हिताचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT