Venus Transit Chitra Nakshatra October 2026 Dainik Gomantak
Horoscope

Shukra Gochar 2026: शरद पौर्णिमेचा चमत्कार! धनदाता शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, 5 राशींचे पालटणार नशीब; होणार पैशांचा वर्षाव

Venus Transit Chitra Nakshatra October 2026: यंदाच्या शरद पौर्णिमेच्या निमित्ताने 25 ऑक्टोबर रोजी धन, संपत्ती आणि ऐश्वर्याचे कारक मानल्या गेलेल्या शुक्र ग्रहाच्या स्थितीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे.

Manish Jadhav

Venus Transit Chitra Nakshatra October 2026: यंदाच्या शरद पौर्णिमेच्या निमित्ताने 25 ऑक्टोबर रोजी धन, संपत्ती आणि ऐश्वर्याचे कारक मानल्या गेलेल्या शुक्र ग्रहाच्या स्थितीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. वक्री शुक्र ग्रह थेट चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार असून, बरोबर एका महिन्यानंतर तो पुन्हा या नक्षत्रात फिरेल आणि त्यानंतर 5 डिसेंबर रोजी स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल.

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाच्या या नक्षत्र बदलाचा मानवी जीवनावर आणि विविध राशींच्या जातकांवर खूप मोठा प्रभाव पडणार आहे. विशेषतः मेष, कन्या, तुळ, वृश्चिक आणि मकर या पाच भाग्यवान राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ, आनंददायी आणि लाभदायक ठरणार आहे.

मेष राशीच्या जातकांसाठी शुक्र ग्रहाचे चित्रा नक्षत्रातील आगमन अत्यंत फलदायी ठरणार आहे. या काळात आर्थिक बाजू भक्कम होईल आणि व्यवसायात घवघवीत यश लाभेल. नोकरी शोधणाऱ्यांना नवे आणि उत्तम प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे तसेच रखडलेले सर्व कागदोपत्री व महत्त्वाचे कामे मार्गी लागतील. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिक घडामोडींच्या दृष्टीने खूप उत्तम राहील. कार्यक्षेत्रात मेहनतीचे चीज होऊन प्रमोशन (Promotion) मिळण्याचा प्रबळ योग आहे. तसेच भागीदारीच्या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.

तुळ राशीचा स्वामी स्वतः शुक्र ग्रह असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा गोचरकाळ प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. नोकरी आणि व्यापार दोन्ही क्षेत्रांत बक्कळ नफा मिळून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कोणतीही नवीन व्यावसायिक डील फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येणार आहे. मनासारखी नोकरी बदलण्याचे योग असून चांगल्या ऑफर्समुळे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबतचे जुने वाद वा ताणतणाव संपुष्टात येतील, मात्र वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल. मकर राशीच्या लोकांसाठी कर्मक्षेत्रात प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील. केलेल्या कष्टाचे योग्य फळ पाहायला मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम असून आर्थिक स्थिरता लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gandhi Jayanti: एका दिवसाची गांधी जयंती अन् 364 दिवस अंधार; झाडू हातात घेण्यापेक्षा गांधीविचार जगण्याची गरज

Colvale Jail Threat: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

Teachers Digital Toolkit: गोव्यात शिक्षकांना मिळणार डिजिटल टूलकिट; 5,100 टॅब्लेटसाठी 'इन्फोटेक'कडून निविदा

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

SCROLL FOR NEXT