Shukra Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

सुख-वैभवाचा 'राजयोग'! शुक्राच्या पॉवरफुल्ल गोचरमुळे 'या' 3 राशींना तगड फायदा, आता फक्त पैसा अन् पैसाच; गोल्डन पिरीयड सुरु

Venus Transit in Bharani Nakshatra April 2026: भरणी हे नक्षत्रमंडळातील दुसरे नक्षत्र असून त्याचे स्वामी स्वतः शुक्र देवच आहेत. जेव्हा कोणताही ग्रह स्वतःच्या नक्षत्रात गोचर करतो, तेव्हा त्याची शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा द्विगुणित होते.

Manish Jadhav

Venus Transit in Bharani Nakshatra April 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सुख, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह आज (6 एप्रिल 2026) पहाटे 1:04 वाजता अश्विनी नक्षत्रातून बाहेर पडून भरणी नक्षत्रात प्रविष्ट झाला. भरणी हे नक्षत्रमंडळातील दुसरे नक्षत्र असून त्याचे स्वामी स्वतः शुक्र देवच आहेत. जेव्हा कोणताही ग्रह स्वतःच्या नक्षत्रात गोचर करतो, तेव्हा त्याची शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा द्विगुणित होते. ज्योतिषाचार्य हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन आर्थिक सुबत्ता, प्रेमसंबंधांतील मधुरता आणि भौतिक सुखसोयींमध्ये वाढ घडवून आणणारे ठरेल. विशेषतः तीन राशींसाठी हा काळ 'गोल्डन पिरीयड' ठरणार आहे.

शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी असल्याने हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेली आर्थिक कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पदोन्नती किंवा पगारवाढीचे योग आहेत, तर व्यापाऱ्यांना अपेक्षित नफा मिळेल. या काळात तुम्ही घर किंवा वाहनासारख्या चैनीच्या वस्तूंची खरेदी करू शकता. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वातील आकर्षण वाढल्याने सामाजिक प्रतिष्ठाही उंचावेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे परिवर्तन भाग्योदयाचे ठरेल. तुम्हाला अचानक धनलाभाच्या संधी मिळतील. विशेषतः जे लोक परदेशी कंपन्यांशी संबंधित काम करतात किंवा ज्यांचा व्यापार परदेशाशी निगडित आहे, त्यांना मोठे यश मिळू शकते. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाल्यामुळे तुम्ही मानसिक शांतता अनुभवू शकाल. कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील, जे आनंददायी आणि लाभदायक ठरतील. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मकता येईल आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही कठीण निर्णयही सहज घेऊ शकाल.

मकर राशीच्या जातकांसाठी शुक्राचे भरणी नक्षत्रातील गोचर सुख आणि समृद्धीची दारे उघडणारे असेल. गुंतवणुकीतून (Investment) चांगला परतावा मिळण्याची शक्यता असून मालमत्तेशी संबंधित वादात तुमच्या बाजूने निकाल लागण्याची चिन्हे आहेत. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा बढती मिळू शकते. वैवाहिक आयुष्यात जीवनसाथीचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे नाते अधिक घट्ट होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुम्ही भौतिक सुखांचा मनमुराद आनंद घेऊ शकाल. एकंदरीत, हा काळ तुमच्यासाठी सर्वार्थाने प्रगतीचा आणि भरभराटीचा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa North: न्याय देत नसाल तर विष द्या ! पळसकट्टा, येथील धनगर समाज महिलांचा प्रकल्पाविरोधात संताप

Mandovi River: चोडण येथील बांध कोसळतोय! दुरुस्तीची मागणी,'मांडवी'चे पाणी फुटण्याचा धोका

Goa Weather Update: गोव्याला अवकाळी पावसाने झोडपले! उकाड्यापासून सुटका, वातावरणात पसरला गारवा

Bicholim Fire: डिचोलीत भरदिवसा फ्लॅटला आग; जीवितहानी टळली, दागिन्यांसह पंधरा लाखांचा ऐवज भस्मसात

Baina Fish Market: बायणा मासळी मार्केटची दुरवस्था; घाऊक विक्रेत्यांना हलवण्याच्या हालचालींवर स्थानिकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT