Shukra Ketu Yuti Dainik Gomantak
Horoscope

Shukra Ketu Yuti 2026: ऑफिसमध्ये प्रमोशन अन् पगारवाढ निश्चित! 4 राशींना मिळणार अफाट संपत्ती आणि सुख; 'शुक्र-केतू'ची युती पालटणार नशीब

Shukra Ketu Yuti 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे गोचर आणि त्यांची युती मानवी जीवनावर प्रभाव पाडत असते. या संदर्भात ऑगस्ट महिन्याची सुरुवातच अत्यंत विशेष आणि काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणारी ठरणार आहे.

Manish Jadhav

Shukra Ketu Yuti 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे गोचर आणि त्यांची युती मानवी जीवनावर प्रभाव पाडत असते. या संदर्भात ऑगस्ट महिन्याची सुरुवातच अत्यंत विशेष आणि काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणारी ठरणार आहे. पंचांगानुसार, ऐश्वर्य, सौंदर्य आणि सुखाचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह शनिवारी (1 ऑगस्ट) सकाळी 9 वाजून 33 मिनिटांनी कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र, या गोचरापूर्वी सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतू ग्रहाची एकत्र युती होणार आहे.

सिंह राशीतील शुक्र आणि केतूची ही अत्यंत दुर्मिळ युती एकूण 4 राशींच्या जातकांसाठी महालाभाचे योग घेऊन येत आहे. विशेषतः वृषभ, कर्क, कन्या आणि तुला या चार राशींच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक प्रगतीचा आणि सुखाचा ठरेल.

या भाग्यवान राशींमध्ये पहिली रास म्हणजेच वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीत अतिशय मजबूत राहील. बऱ्याच दिवसांपासून कुठेतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात तुम्हाला अचानक परत मिळू शकतात. व्यावसायिकांना एखादी मोठी आणि फायदेशीर डील मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. तुमच्या सुख-सुविधांमध्ये मोठी वाढ होईल आणि करिअरमध्ये यशाचे नवे मार्ग मोकळे होतील.

दुसरी भाग्यवान रास म्हणजेच कर्क राशीच्या जातकांच्या प्रोफेशनल लाईफसाठी हा काळ वरदान ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये प्रमोशन मिळण्याची किंवा पगारवाढ होण्याची मोठी शक्यता आहे. व्यापारात चांगला नफा कमावता येईल आणि या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा फायदा करुन देईल. तसेच आरोग्याची उत्तम साथ लाभेल.

कन्या राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ अत्यंत शुभ आणि प्रगतीचा असणार आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये (Income) अनपेक्षित वाढ झाल्यामुळे आर्थिक चणचण दूर होईल. कमाईचे नवीन आणि एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. जे लोक व्यापारी आहेत, त्यांना बाजारात एखादी मोठी डील मिळाल्यामुळे तगडा नफा कमावता येईल.

चौथी आणि शेवटची भाग्यवान रास म्हणजेच तुळ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि केतूची ही युती अत्यं फलदायी ठरणार आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमच्या मान-सन्मानात कमालीची वृद्धी होईल. तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि जुनी स्वप्ने पूर्ण होतील. एकूणच, 1 ऑगस्टला होणारा हा ग्रहांचा बदल या चार राशींच्या आयुष्यात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT