Surya Gochar 2025 Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2025: पैसे मिळणार, करिअर सुधारणार; 'सूर्य गोचर' तुमच्या राशीला काय देणार?

17 August Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. तो आत्म्याचा कारक ग्रह असून नेतृत्व, उत्साह, शक्तीचे प्रतीक आहे. सूर्य बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात मान-सन्मानाची प्राप्ती होते.

Sameer Panditrao

वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याच्या राशीपरिवर्तनाला विशेष महत्त्व दिले जाते. सूर्य दर महिन्याला राशी बदलतो, ज्याला सूर्यसंक्रांती म्हणतात. यावर्षी १७ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजून ४१ मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. तो आत्म्याचा कारक ग्रह असून नेतृत्व, उत्साह आणि शक्तीचे प्रतीक आहे. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात मान-सन्मानाची प्राप्ती होते. चला तर मग पाहूया सूर्याच्या या गोचराचा १२ राशींवर कसा प्रभाव होईल.

मेष

सूर्य पंचम भावातून गोचर करणार असल्यामुळे कार्य-व्यवसाय, शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रांत उत्तम यश मिळेल. मात्र प्रेमसंबंधांत उदासीनता राहील. नवीन लोकांशी परिचय होऊन त्याचा फायदा होईल.

वृषभ

चतुर्थ भावात सूर्याचे गोचर मिश्र फळकारक राहील. शासनाच्या कामांत प्रलंबित प्रश्न सुटतील. आरोग्याबाबत काळजी घ्या. प्रवासात सावधगिरी बाळगा. मालमत्तेसंबंधी वाद मिटतील.

मिथुन

तृतीय भावातील सूर्याचा प्रभाव उत्साह वाढवेल. कठीण परिस्थिती सहज सांभाळाल. पण कुटुंबीयांसोबत वाद होऊ शकतो. धर्म, अध्यात्मात रुची वाढेल. शासनसत्तेचे सहकार्य मिळेल.

कर्क

द्वितीय भावातील सूर्यामुळे अचानक धनलाभ होईल. मालमत्ता-संबंधी प्रश्न सुटतील. वाहन खरेदीसाठी योग्य काळ. पण काम गुप्त ठेवा; पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक करू नका.

सिंह

स्वराशीत सूर्याचा प्रवेश तुमच्यासाठी वरदानासारखा ठरेल. आरोग्य थोडे बिघडेल, पण व्यवसायात प्रगती होईल. शासन-सत्तेचे सहकार्य लाभेल. नवीन कामांत यशाची शक्यता.

कन्या

बाराव्या भावात सूर्यामुळे खर्च व धावपळ वाढेल. परदेशी नोकरी, व्हिसा इत्यादीसाठी उत्तम काळ. न्यायालयीन खटल्यांत यश. मात्र या काळात जास्त कर्ज देऊ नका.

तुला

अकराव्या भावात सूर्य लाभदायी राहील. रणनीती यशस्वी ठरेल. उत्पन्नाचे साधन वाढतील. नोकरीत बदलाची शक्यता. मुलांबाबत काळजी घ्या.

वृश्चिक

दहाव्या भावातील सूर्य इच्छित यश देईल. सरकारी कामांत यशाची शक्यता. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. यश असूनही मानसिक तणाव राहील.

धनु

नवम भावातील सूर्य भाग्योन्नतीकारक राहील. धर्म, अध्यात्मात रुची वाढेल. दानधर्म कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संतानप्राप्तीची शक्यता.

मकर

अष्टम भावात सूर्यामुळे चढ-उतार जाणवतील. मान-सन्मान वाढेल, पण आरोग्यावर विपरीत परिणाम. शत्रूंपासून सावध राहा. तरीही अचानक धनलाभ होईल.

कुंभ

सप्तम भावातील सूर्यामुळे वैवाहिक जीवनात तणाव. व्यावसायिक भागीदारी टाळा. मात्र सरकारी टेंडर किंवा परदेशगमनासाठी योग्य काळ.

मीन

सहाव्या भावातील सूर्य शत्रूंवर विजय देईल. न्यायालयीन प्रकरणांत यश. सरकारी नोकरीच्या संधी. प्रवासात सावधगिरी बाळगा. वाहन-दुर्घटना टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT