Horoscope | Rashi Bhavishya Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya: आळस झटकून तयार राहा! आनंदवार्ता कानी पडणार; 'या' राशींसाठी उत्तम काळ

Horoscope 5 September: करिअर, व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक आयुष्यात कुणाच्या पदरात यश पडेल आणि कुणाला सावधगिरी बाळगावी लागेल, हे पाहूया आजच्या राशीभविष्यातून.

Sameer Panditrao

आजचा दिवस काही राशींना नवे संधीद्वार उघडणारा ठरणार आहे, तर काहींनी प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची गरज आहे. करिअर, व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक आयुष्यात कुणाच्या पदरात यश पडेल आणि कुणाला सावधगिरी बाळगावी लागेल, हे पाहूया आजच्या राशीभविष्यातून.

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, जबाबदाऱ्या वाढतील आणि एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल. वृषभ राशीला आर्थिक लाभाचे संकेत आहेत. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते आणि वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल.

मिथुन राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक वाद टाळा आणि आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करा. कर्क राशीसाठी दिवस मध्यम स्वरूपाचा असला तरी जमीन-जायदाद किंवा नोकरीतील बदल फायदेशीर ठरू शकतात. भावनिक निर्णय टाळावेत.

सिंह राशीमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह दिसून येईल. सामाजिक कार्यक्रमात सहभाग मिळेल, मात्र कुटुंबातील एखाद्या लग्नकार्याबाबत अडचण येऊ शकते. कन्या राशीला नवे उपक्रम सुरू करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांनी आळस सोडून अभ्यासाकडे लक्ष द्यावे.

तुळ राशीने बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवणे गरजेचे आहे. वृश्चिक राशीसाठी व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम दिवस असून मित्रांचे सहकार्य लाभेल. धनु राशीला मिश्र फळ मिळेल; घाईघाईने निर्णय घेऊ नका आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर राशीला उत्पन्न वाढेल, मात्र खर्चही वाढतील. कुंभ राशीच्या दीर्घकालीन योजनांना गती मिळेल. मीन राशीच्या लोकांसाठी अडचणी दूर होण्याचा दिवस असून अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि करिअरबाबत योग्य निर्णय घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT