ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य देव आता मकर राशीत विराजमान झाला आहे. १५ जानेवारीपासून सूर्याच्या या संक्रमणामुळे (मकर संक्रांत) अनेक राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांच्या मते, हा काळ विशेषतः ४ राशींसाठी 'गोल्डन टाइम' ठरणार असून, पुढील एका महिन्यात त्यांच्यावर धनाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. केवळ आर्थिकच नाही, तर करिअर आणि न्यायालयीन प्रकरणांतही या राशींना मोठे यश मिळेल.
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य दहाव्या स्थानी गोचर करत आहे. हे स्थान कर्म आणि करिअरचे मानले जाते. त्यामुळे नोकरीत असलेल्यांना बढतीचे योग आहेत, तर व्यावसायिकांना मोठा नफा मिळेल. विशेष म्हणजे, या काळात तुमच्या वडिलांची प्रगती होईल आणि त्यांच्या सहकार्याने तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ आता मिळण्याची वेळ आली आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य नवव्या स्थानी म्हणजेच भाग्याच्या स्थानी आला आहे. यामुळे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत. तुम्ही ज्या कामात हात घालल, तिथे तुम्हाला यश निश्चित मिळेल. तुमचा कल धार्मिक कार्याकडे वाढेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. नशिबाची साथ मिळाल्यामुळे अत्यंत कमी श्रमात मोठी फळे मिळण्याचे हे दिवस आहेत.
धनु राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे संक्रमण दुसऱ्या स्थानी होत आहे, जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. या काळात तुम्हाला अनपेक्षित मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल.
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य अकराव्या स्थानी गोचर करत आहे. हे स्थान उत्पन्न आणि लाभाचे आहे. यामुळे तुमच्या पगारात वाढ होऊ शकते किंवा व्यवसायात मोठी उलाढाल होईल. तुमच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या इच्छा या ३० दिवसांत पूर्ण होतील. नवीन लोकांशी होणारे परिचय तुम्हाला भविष्यात मोठा आर्थिक फायदा मिळवून देतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.