Vaidhriti Yoga Dainik Gomantak
Horoscope

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Vaidhriti Yoga 2026: खगोलशास्त्र आणि ग्रहमंडळाच्या विशेष स्थितीमुळे आज (22 जुलै) सूर्य आणि चंद्र ग्रहांच्या मीलनातून 'वैधृती योग' निर्माण होत आहे.

Manish Jadhav

Vaidhriti Yoga 2026: खगोलशास्त्र आणि ग्रहमंडळाच्या विशेष स्थितीमुळे आज (22 जुलै) सूर्य आणि चंद्र ग्रहांच्या मीलनातून 'वैधृती योग' निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा वैधृती योग अतिशय संवेदनशील आणि काही राशींसाठी आव्हानात्मक मानला जातो. या अशुभ योगाच्या थेट प्रभावामुळे प्रामुख्याने मेष, कर्क, तूळ, मकर आणि कुंभ या पाच राशींच्या जातकांना विविध अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या कालावधीत या पाचही राशींच्या व्यक्तींनी मानसिक ताणतणाव, कौटुंबिक कलह आणि आर्थिक नुकसानीपासून वाचण्यासाठी प्रत्येक पाऊल अत्यंत सतर्कतेने टाकणे गरजेचे आहे.

मेष राशीच्या लोकांसाठी हा योग वैवाहिक जीवनात काही प्रमाणात तणाव निर्माण करु शकतो. जोडीदारासोबतच्या संवादात गैरसमज वाढण्याची शक्यता असल्याने संयम ठेवणे आवश्यक आहे. त्यासोबतच मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कोणताही निर्णय घाईगडबडीत घेणे टाळावे. आजच्या दिवशी कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे अंगलट येऊ शकते. तसेच, कर्क राशीच्या जातकांना वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तीव्र मानसिक दडपण जाणवू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना मनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोणतेही काम शांत डोक्याने आणि विचारपूर्वक करणे हितकारक ठरेल.

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कार्यक्षेत्रात काही आव्हाने घेऊन येऊ शकतो. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने कामात स्पष्टता आणि शांतता ठेवणे गरजेचे आहे. या मानसिक तणावाचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, त्यामुळे आज स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच, मकर राशीच्या लोकांना वैवाहिक आयुष्य आणि करिअर (Career) अशा दोन्ही आघाड्यांवर सावध राहावे लागेल. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे त्यांच्यासाठी हिताचे ठरेल.

शेवटी कुंभ राशीच्या जातकांबाबत सांगायचे तर, त्यांना कार्यस्थळावर विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आजच्या दिवशी प्रवास करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, कारण मौल्यवान वस्तू किंवा पैशांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच, वैधृती योगाच्या काळात या पाचही राशींच्या लोकांनी आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक संबंध जपताना कमालीची दक्षता घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT