Surya Gochar Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Surya Rashi Parivartan 2026: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व असते. आज (17 ऑगस्ट) सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी सूर्य ग्रहाने आपली स्वराशी असलेल्या सिंह राशीमध्ये प्रवेश केला.

Manish Jadhav

Surya Rashi Parivartan 2026: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व असते. आज (17 ऑगस्ट) सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी सूर्य ग्रहाने आपली स्वराशी असलेल्या सिंह राशीमध्ये प्रवेश केला. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह असून, हा गोचर 17 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर सूर्य कन्या राशीमध्ये प्रवेश करेल.

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य हा पिता, आत्मविश्वास, मान-सन्मान आणि यशाचा कारक मानला जातो. त्यामुळे सूर्याचे हे राशी परिवर्तन अनेक राशींसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि लाभदायक ठरणार आहे. विशेषतः मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि मकर या पाच राशींच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरु शकतो.

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण प्रेम संबंधांमध्ये गोडवा निर्माण करणारे ठरेल. तुमचे नाते अधिक मजबूत होईल आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आहे. घरातील वातावरणात आनंद आणि चैतन्य टिकून राहील. स्वतः सिंह राशीमध्येच सूर्याचे आगमन होत असल्याने सिंह राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासामध्ये लक्षणीय वाढ होईल. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आणि ऑफिसमध्ये तुम्हाला नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे गोचर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग असून, तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल आणि आत्मविश्वासात भर पडेल.

धनु राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे संक्रमण अत्यंत लकी ठरणार आहे. अनेक प्रलंबित कामांमध्ये यश मिळून आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. समाजातील तुमच्या मान-सन्मानामध्ये वाढ होईल आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. मकर राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण करिअरच्या (Career) दृष्टीने प्रगतीचे नवे दालन उघडणारे आहे. आर्थिक आघाडीवर परिस्थिती उत्तम राहील, तसेच नोकरी आणि व्यापारात विशेष नफा मिळण्याचे योग आहेत.

एकंदरीत, सूर्याचे हे सिंह राशीतील संक्रमण या पाचही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल आणि यशाची नवी पहाट घेऊन आले आहे. ज्यांच्या राशीत सूर्याचे संक्रमण होत आहे, त्यांना या कालावधीत आपल्या कामाच्या ठिकाणी विशेष ओळख आणि प्रतिष्ठा प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT