Surya Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2026: अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव अन् घरात आनंदाचे वातावरण, 'सूर्य गोचर' ठरणार वरदान; 3 राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Surya Gochar Benefits: नवग्रहांचे राजे मानले जाणारे सूर्यदेव साधारणतः प्रत्येक महिन्याला आपली राशी बदलतात. त्यांच्या या राशी परिवर्तनाला संक्रांत म्हटले जाते.

Manish Jadhav

Surya Gochar Benefits: नवग्रहांचे राजे मानले जाणारे सूर्यदेव साधारणतः प्रत्येक महिन्याला आपली राशी बदलतात. त्यांच्या या राशी परिवर्तनाला संक्रांत म्हटले जाते आणि याचा सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव पडतो. 15 मे रोजी सूर्यदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आणि सध्या ते याच राशीत विराजमान आहेत. आता एका महिन्यानंतर म्हणजेच येत्या 15 जून 2026 रोजी सोमवार, दुपारी 12 वाजून 58 मिनिटांनी सूर्यदेव वृषभ राशीतून बाहेर पडून बुध ग्रहाची राशी असलेल्या मिथुन राशीत गोचर करणार आहेत. सूर्याचे हे राशी परिवर्तन तीन राशींच्या जातकांसाठी अत्यंत शुभ, फलदायी आणि आर्थिक प्रगती घडवून आणणारे ठरणार आहे. मेष, मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांना या काळात नशिबाची खंबीर साथ लाभणार आहे.

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने सुवर्णसंधी घेऊन येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन आणि चांगल्या संधी उपलब्ध होतील. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली किंवा अर्धवट राहिलेली कामे या काळात यशस्वीरित्या पूर्ण होतील. तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी अधिक चांगला ठसा उमटवू शकाल. व्यापार आणि व्यवसायात प्रगतीचे योग असून, अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि सक्षम बनेल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ कार्यक्षेत्रात विशेष यश देणारा ठरेल, कारण सूर्यदेव तुमच्याच राशीत प्रवेश करत आहेत. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला एक नवी ओळख किंवा मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. जे लोक व्यापार क्षेत्रात आहेत, त्यांना या गोचर काळामध्ये मोठा आर्थिक नफा कमावता येईल. कौटुंबिक आघाड्यांवरही आनंदाचे वातावरण राहील. विशेषतः अविवाहित लोकांसाठी विवाहाचे उत्तम प्रस्ताव येण्याचे योग आहेत आणि आर्थिक बाबींशी संबंधित तुमच्या सर्व चिंता दूर होतील.

सिंह राशीच्या जातकांबद्दल सांगायचे तर, तुमच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या मेहनतीचे योग्य आणि गोड फळ आता तुम्हाला मिळणार आहे. नोकरीत पदोन्नती (Promotion) आणि व्यवसायात विस्ताराचे उत्तम योग बनत आहेत. बऱ्याच काळापासून रखडलेले तुमचे महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील. थोडक्यात सांगायचे तर, या गोचरच्या प्रभावामुळे मेष, मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांच्या करिअरला एक नवी गती मिळेल आणि चहूबाजूंनी धनलाभाचे मार्ग मोकळे होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT