Surya Ketu Yuti 2026 Dainik Gomantak
Horoscope

Surya Ketu Yuti 2026: सूर्याचं राशी परिवर्तन अन् केतुचा महासंगम! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

Grahan Yog August 2026 Zodiac Impact: ज्योतिषशास्त्रानुसार 17 ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीतून निघून स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

Manish Jadhav

Grahan Yog August 2026 Zodiac Impact: ज्योतिषशास्त्रानुसार 17 ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीतून निघून स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे स्व:तच्या राशीत होणारे हे भ्रमण नेहमीच विशेष मानले जाते, परंतु यंदा सिंह राशीत आधीपासूनच छायाग्रह केतु विराजमान आहे. यामुळे सिंह राशीत सूर्य आणि केतु यांची दुर्मिळ युती तयार होत असून, यालाच ज्योतिषशास्त्रात 'ग्रहण योग' असे म्हटले जाते.

सूर्य हा आत्मविश्वास अन् प्रतिष्ठेचा कारक मानला जातो, तर केतु हा अलिप्ततेचा ग्रह आहे. ही युती आव्हानात्मक असली तरी सर्वच राशींसाठी अशुभ ठरणार नाही. विशेषतः मेष, धनु आणि कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य-केतुची ही युती कमाई आणि करिअरच्या (Career) बाबतीत नवे मार्ग खुली करणारी ठरेल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता अचानक मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची नेतृत्वक्षमता वरिष्ठांच्या नजरेत येईल, ज्यामुळे नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात जुने संपर्क उपयोगी पडतील आणि अडकलेले पैसे परत मिळून आर्थिक दिलासा मिळेल. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत भविष्याबाबत सकारात्मक चर्चा होईल आणि कौटुंबिक वातावरणात तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी घाईगडबडीत मोठे निर्णय घेणे टाळावे आणि या काळात गरजू व्यक्तीला अन्नदान करणे शुभ ठरेल.

धनु राशीच्या जातकांसाठी हे ग्रहमान नशिबाची साथ घेऊन येत आहे. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन भूमिकेबाबत चर्चा सुरु होऊ शकते. व्यापाऱ्यांना दुसऱ्या शहरातून किंवा परदेशातून व्यवसायाच्या नव्या संधी मिळून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. दीर्घकाळापासून रखडलेल्या डील्स पुन्हा मार्गी लागतील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ही वेळ चांगली बातमी आणू शकते. केवळ बोलताना नम्रता राखणे गरजेचे आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन पैशांच्या व्यवहारात मोठे बदल घडवून आणेल. उत्पन्न वाढवण्यासाठी आखलेले नवे प्लॅन यशस्वी ठरतील. नोकरीत पगारातील वाढ किंवा इन्सेंटिव्हबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो. जुन्या ओळखींमधून अचानक धनलाभाचे संकेत आहेत. कोणत्याही नवीन ऑफरचा स्वीकार करण्यापूर्वी तिच्या सर्व अटी काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला ज्योतिषाचार्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT