Sun Transit March 2026 Dainik Gomantak
Horoscope

Grah Gochar March 2026: "पैसा, प्रमोशन आणि प्रेमाची त्रिवेणी युती''! मार्च महिन्यात सूर्य-शुक्राचे महागोचर; 'या' राशींच्या आयुष्यात लवकरच सुखाचे दिवस

Sun Transit March 2026: धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहांचे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

Manish Jadhav

Grah Gochar March 2026: धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहांचे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ग्रहांच्या या हालचालींचा मानवी जीवनावर शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारचे प्रभाव पडत असतात. मार्च 2026 मध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रह, म्हणजेच ग्रहांचा राजा सूर्य आणि सुख-समृद्धीचा कारक मानला जाणारा शुक्र, आपले राशी परिवर्तन करणार आहेत. या गोचरामुळे अनेक राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडून येणार असून आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रगतीचे योग जुळून येत आहेत.

द्रिक पंचांगानुसार, ग्रहांचा राजा सूर्य देव 15 मार्च 2026, रविवारी रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे मीन राशीतील हे भ्रमण अनेक राशींसाठी भाग्योदयाचे ठरणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, म्हणजेच 26 मार्च 2026, गुरुवारी पहाटे 5 वाजून 13 मिनिटांनी शुक्र ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. सूर्य आणि शुक्राचे हे एकामागून एक होणारे गोचर वृषभ, मिथुन, धनु आणि कुंभ या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरेल. तुम्ही केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळण्याची हीच वेळ आहे. व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरच्या क्षेत्रात हे गोचर 'जॅकपॉट' ठरु शकते. नोकरीत बढती किंवा व्यवसायात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक सुधारेल.

धनु राशीच्या जातकांसाठी सूर्य आणि शुक्राचे हे राशी परिवर्तन कौटुंबिक सौख्य आणि धनलाभाचे संकेत देत आहे. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. अनपेक्षित धनलाभ झाल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल. तसेच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत आशादायक आहे. जीवनात प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश संपादन करता येईल आणि गुंतवणुकीतून (Investment) चांगला परतावा मिळण्याचे योग आहेत.

एकूणच मार्च महिन्यातील हे ग्रहमान ठराविक राशींसाठी भाग्याचा उदय करणारे ठरणार आहे. या काळात योग्य नियोजन आणि मेहनतीला नशिबाची साथ लाभल्यास प्रगतीचे शिखर गाठणे सोपे होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याच्या सौंदर्याला प्रदूषणाचे ग्रहण; 19 पैकी 18 बीचेस पोहण्यासाठी 'असुरक्षित', नद्यांचीही अवस्था दयनीय

Video: 'घणचे कटर घण'चा जल्लोष! पहा डिचोलीतील 'घोडेमोडणी'तील घोडेनृत्याचे खास व्हिडीओ

Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजयाचे सेलिब्रेशन! कुठे होणार 'व्हिक्ट्री परेड'? दिल्लीत की मुंबईत? सर्व जाणून घ्या

Goa Opinion: प्रत्येक आमदाराला विकासकामांसाठी 100 कोटी दिल्यावर काय फरक पडू शकतो?

Portuguese Citizen: पोर्तुगीज नागरिकत्व लपवले, वास्कोच्या मतदारयादीत नोंदवले नाव; परदेशी महिलेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT