Dwidwadashy Yog 2026 Dainik Gomantak n
Horoscope

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

Shukra Mangal Dwidwadash Yoga: द्रिक पंचांगानुसार, शुक्रवारी सकाळी 8:17 वाजता शुक्र आणि मंगल या दोन्ही ग्रहांनी एकमेकांपासून 30 अंशांच्या अंतरावर येत 'द्विद्वादश योग' निर्माण केला.

Manish Jadhav

Dwidwadashy Yog 2026: ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस (13 मार्च) अत्यंत महत्त्वाचा ठरला. द्रिक पंचांगानुसार, शुक्रवारी सकाळी 8:17 वाजता शुक्र आणि मंगल या दोन्ही ग्रहांनी एकमेकांपासून 30 अंशांच्या अंतरावर येत 'द्विद्वादश योग' निर्माण केला. हा योग ज्योतिषशास्त्रात अत्यंत प्रभावी मानला जातो, कारण शुक्र हा धन, सुख-सुविधा आणि विलासी जीवनाचा कारक आहे, तर मंगल हा ऊर्जा, साहस आणि विशेषतः जमीन-जुमला किंवा स्थावर मालमत्तेचा स्वामी मानला जातो.

जेव्हा शुक्राची 'धनाची इच्छा' आणि मंगळाची 'कार्यक्षमता' एकत्र येते, तेव्हा आर्थिक लाभ आणि मालमत्ता खरेदीचे योग प्रबळ होतात. या विशेष ग्रहावस्थेमुळे तीन राशींच्या जातकांसाठी भाग्योदयाची द्वारे उघडणार असून त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत.

या योगाचा सर्वात सकारात्मक परिणाम मेष राशीच्या जातकांवर दिसून येईल. मेष राशीचा स्वामी स्वतः मंगल असून तो धनाचा कारक शुक्राशी हातमिळवणी करत आहे. यामुळे तुमच्या आर्थिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढणार आहे. जर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या घरासाठी धडपड करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे. केवळ घराचे स्वप्नच नाही, तर अचानक मिळणाऱ्या धनलाभामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्याचा आनंद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळेल, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला नवीन उंची गाठता येईल.

वृषभ राशीसाठी हा योग कौटुंबिक सौख्य आणि वाहन सुख वाढवणारा ठरेल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र जेव्हा मंगळाच्या संपर्कात येतो, तेव्हा तुमच्या जीवनात भौतिक सुखांची रेलचेल सुरु होते. या काळात तुम्ही केवळ नवीन घराचा विचार करणार नाही, तर सध्याच्या घराचे नूतनीकरण किंवा सौंदर्य वाढवण्यावरही भर द्याल. नवीन मालमत्तेत गुंतवणूक (Investment) करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. आई-वडिलांच्या मदतीने एखादे मोठे रखडलेले काम मार्गी लागेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुमची स्वप्ने सत्यात उतरताना पाहून तुम्हाला भाग्याचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाणवेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र-मंगल युती म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्याने आणि मंगल तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरत असल्याने स्वतःचे सुंदर आशियाना उभारण्याची तुमची इच्छा आता वास्तवात येईल. या काळात कुटुंबात एखादे मंगल कार्य ठरण्याचे योग आहेत, ज्यामुळे घरामध्ये उत्सवाचे वातावरण असेल. पैशांचा ओघ वाढल्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सर्व इच्छा पूर्ण करु शकाल. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांतून तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ भौतिक सुखच नाही, तर समाजात मान-सन्मान आणि कुटुंबात गौरव मिळवून देणारा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'22 मिनिटांचा तो थरार' विसरु नका, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकड्यांना थेट इशारा; 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेलं नाही!

UPI Transactions Record March 2026: डिजीटल इंडियाचा नवा विक्रम! UPI व्यवहारांनी गाठला ऐतिहासिक टप्पा; मार्च महिन्यात 22.64 अब्ज ट्रान्झॅक्शनची नोंद

ना विराट, ना सचिन; युवीच ठरला हिरो! अर्जुन तेंडुलकरनं बॅटिंग आयडॉलवरुन चकवलं, युवराजच्या 'फियरलेस' शैलीचा दिवाना

एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ! 167 कोटींच्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश, पर्यटकांच्या अन्नात कालवलं विष; 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

SCROLL FOR NEXT