Shani Trayodashi Dainik Gomantak
Horoscope

Shani Trayodashi 2026: 14 की 15 फेब्रुवारी, कधी आहे 'शनि त्रयोदशी'? साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम योग; जाणून घ्या पूजेची अचूक वेळ अन् शुभ मुहूर्त

Shani Trayodashi 2026: हिंदू धर्मात शनि प्रदोष व्रताला अत्यंत विशेष महत्त्व असून जेव्हा त्रयोदशी तिथी शनिवारी येते, तेव्हा तिला 'शनि त्रयोदशी' असे म्हटले जाते.

Manish Jadhav

Shani Trayodashi Puja हिंदू धर्मात शनि प्रदोष व्रताला अत्यंत विशेष महत्त्व असून जेव्हा त्रयोदशी तिथी शनिवारी येते, तेव्हा तिला 'शनि त्रयोदशी' असे म्हटले जाते. फेब्रुवारी 2026 मध्ये कृष्ण पक्षातील त्रयोदशी शनिवारी येत असल्याने हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. ही तिथी भगवान शिव आणि शनिदेव या दोघांनाही प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.

पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजून 2 मिनिटांनी सुरु होईल आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजून 3 मिनिटांनी समाप्त होईल. प्रदोष व्रताची पूजा ही प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी केली जाते, त्यामुळे शनि त्रयोदशी आणि प्रदोष व्रत हे दोन्ही 14 फेब्रुवारी, शनिवार रोजीच पाळले जातील.

धार्मिक दृष्टिकोनातून शनि त्रयोदशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शनिदेवाची साडेसाती, ढैय्या किंवा शनि ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस फलदायी मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी विधीवत पूजा आणि उपाय केल्यास कुंडलीतील शनि दोषासोबतच राहु-केतु आणि कालसर्प दोषांपासूनही दिलासा मिळतो. ज्या व्यक्ती आर्थिक संकटात आहेत किंवा ज्यांना आरोग्याच्या समस्या सतावत आहेत, त्यांच्यासाठी शिव आणि शनिदेवाची संयुक्त उपासना वरदान ठरते. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे दैवत असल्याने आणि भगवान शिव हे त्यांचे गुरु असल्याने या दिवशी केलेल्या प्रार्थनेचा प्रभाव अधिक जलद होतो.

शनि त्रयोदशीच्या निमित्ताने काही विशेष उपाय केल्यास आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होते. शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी शिवलिंगावर तिळाच्या तेलाने अभिषेक करावा. तसेच, शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांना काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करणे शुभ मानले जाते. यासोबतच पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हा एक प्रभावी उपाय आहे. शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करुन दिवा लावल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते. मनोभावे केलेली ही भक्ती भक्तांना दुःखातून बाहेर काढते आणि सुख-समृद्धी प्रदान करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

US Visa Fraud Case: कॅमेऱ्यासमोर शस्त्राचा धाक, पण सगळं 'फेक'! ग्रीन कार्डसाठी 'डेंजर' जुगाड; अमेरिकन पोलिसांकडून 11 भारतीयांना बेडया

Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

SCROLL FOR NEXT