Shani Gochar Dainik Gomantak
Horoscope

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Shani Revati Nakshatra 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायाची देवता मानले जाते.

Manish Jadhav

Shani Revati Nakshatra 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायाची देवता मानले जाते. शनिदेवाचे राशी परिवर्तन असो किंवा नक्षत्र परिवर्तन, त्यांचे प्रत्येक गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः शनि जेव्हा नक्षत्राच्या पदामध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक दीर्घकाळ आणि सखोल असतो. द्रिक पंचांगानुसार, 20 ऑगस्ट रोजी शनिदेव रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये प्रवेश करत आहेत.

रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह असून, बुध आणि शनीचे संबंध स्नेहाचे मानले जातात. त्यामुळे शनीच्या या नक्षत्र पद बदलामुळे मेहनत, नियोजन, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील. या गोचरचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असला, तरी 5 राशींसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली आणि जॅकपॉट ठरणारा आहे.

वृषभ राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचर करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊन नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील आणि जुन्या क्लायंट्सकडून मोठा फायदा होईल. तसेच कर्क राशीच्या लोकांसाठी करिअरमधील अनिश्चितता संपून पदोन्नती (Promotion) आणि पगारात वाढ होण्याचे उत्तम योग आहेत. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील आणि परदेश प्रवासाची संधी चालून येऊ शकते.

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन उपलब्धींचा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल, नवीन डील्स फायनल होतील आणि उत्पन्न स्थिर राहील. नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदीचे नियोजन पूर्णत्वास जाऊ शकते. दुसरीकडे, वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचर मेहनतीचे फळ देणारे ठरेल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल आणि प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

मकर राशीच्या लोकांसाठी शनीचे हे नक्षत्र गोचर अतिशय प्रभावशाली सिद्ध होणार आहे. करिअरमध्ये यश आणि सन्मान मिळेल, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मकर या 5 राशीच्या जातकांसाठी शनीचे हे नक्षत्र पद परिवर्तन आर्थिक समृद्धी, करिअरमधील नवी झेप आणि कौटुंबिक सुखाचे सुवर्णदिवस घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT