Astrology lucky colours Dainik Gomantak
Horoscope

राशीनुसार रंग परिधान केल्यानं होईल फायदा, देवी करेल मनोकामना पूर्ण; तुमचा Lucky Colour कोणता? वाचा

lucky colour by zodiac sign: ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात पूजा-अर्चा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे

Akshata Chhatre

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावर्षीचा नवरात्रीचा उत्सव पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. हा उत्सव ९ दिवसांचा नसून, तब्बल १० दिवसांचा असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात पूजा-अर्चा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. याशिवाय, नवरात्रीमध्ये आपल्या राशीनुसार योग्य रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. योग्य रंगाचे कपडे घातल्याने देवी माता लवकर प्रसन्न होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

तुमच्या राशीनुसार कोणते रंग शुभ आहेत?

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे खूप शुभ राहील. हे रंग सकारात्मकता आणि ऊर्जा आणतात.

वृषभ: या राशीच्या लोकांसाठी गुलाबी आणि पांढरा रंग विशेष फायदेशीर ठरू शकतो. हे रंग शांतता आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत.

मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हिरवा रंग अत्यंत शुभ मानला जातो. या नवरात्रीत हिरव्या रंगाचे कपडे घातल्यास सौभाग्य लाभेल आणि यश मिळेल.

कर्क: कर्क राशीच्या लोकांनी पांढरा किंवा कोणत्याही फिकट रंगाचे कपडे घालणे योग्य ठरेल. हे रंग तुमच्यासाठी मन:शांती आणि सकारात्मकता आणतील.

सिंह: सिंह राशीच्या व्यक्तींनी नवरात्रीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास त्यांची अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील आणि त्यांना यश मिळेल.

कन्या: नवरात्रीमध्ये कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हिरवा रंग परिधान करणे खूप शुभ राहील. हा रंग तुमच्या जीवनात संतुलन आणि स्थैर्य राखण्यास मदत करेल.

तूळ: या राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी पांढऱ्या आणि फिकट रंगाच्या कपड्यांची निवड करावी. हा पोशाख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल आणि केशरी रंगाचे कपडे घालावे. या रंगांमुळे देवी माता लवकर प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील.

धनु: धनु राशीच्या व्यक्तींसाठी पिवळा रंग खूप शुभ आहे.

मकर: मकर राशीच्या लोकांसाठी निळा रंग शुभ मानला जातो. या रंगाचे कपडे घातल्यास मन शांत आणि आनंदी राहील.

कुंभ: कुंभ राशीच्या व्यक्तींनी नवरात्रीमध्ये काळ्या आणि निळ्या रंगाच्या कपड्यांची निवड करावी. हे रंग त्यांच्यासाठी खूप योग्य आहेत.

मीन: मीन राशीच्या लोकांसाठी केशरी, पिवळा किंवा कोणत्याही फिकट रंगाचे कपडे परिधान करणे खूप फायदेशीर ठरेल.

(दैनिक गोमंतक या माहितीच्या सत्यतेची हामी देत नाही)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

SCROLL FOR NEXT