Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: 'या' राशींना होणार धनप्राप्ती! ग्रह देताहेत शुभसंकेत; कुणाला होणार फायदा? वाचा राशिभविष्य

Rashi Bhavishya: १६ ते २२ मार्चदरम्यान ग्रहांची हालचाल अनेकांच्या जीवनावर परिणाम करणारी ठरणार असल्याचे ज्योतिष अभ्यासकांचे मत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

१६ ते २२ मार्चदरम्यान ग्रहांची हालचाल अनेकांच्या जीवनावर परिणाम करणारी ठरणार असल्याचे ज्योतिष अभ्यासकांचे मत आहे. १६ मार्चच्या संध्याकाळी चंद्रदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. या काळात मंगळ आणि चंद्र यांच्या योगामुळे धनप्राप्तीचे संकेत निर्माण होऊ शकतात.

त्यानंतर १८ मार्चच्या रात्री चंद्र राशीत प्रवेश करेल. त्या वेळी सूर्य, शुक्र आणि इतर ग्रहांच्या प्रभावामुळे विशेष योग तयार होण्याची शक्यता आहे. पुढे २१ मार्चला चंद्र मेष राशीत प्रवेश करणार असून त्यानंतर कृतीशीलता आणि नवी प्रेरणा वाढू शकते.

या आठवड्यात ग्रहस्थितीमुळे सुरुवातीला आत्मपरीक्षण, नंतर भावनिक संवेदनशीलता आणि शेवटी कार्यशीलतेकडे प्रवास घडण्याचे संकेत आहेत. मीन राशीत सूर्य आणि शुक्र यांच्या उपस्थितीमुळे करुणा, सौंदर्यदृष्टी आणि सर्जनशीलता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी बुध ग्रह प्रतिगामी स्थितीत असल्याने कोणताही निर्णय घेताना संयम आणि विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक असल्याचे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

मेष राशीच्या व्यक्तींनी योजनांबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. वृषभ राशींसाठी सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत. मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन कल्पना आणि सहकार्यामुळे कामात प्रगती होऊ शकते. कर्क राशींसाठी नवी प्रेरणा आणि आशावाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींनी नातेसंबंधांमध्ये संयम राखणे गरजेचे आहे, तर कन्या राशींसाठी संतुलित विचार आणि शिस्त महत्त्वाची ठरेल. तुळ राशीच्या व्यक्तींनी आरोग्य आणि दैनंदिन जीवनशैलीकडे लक्ष द्यावे. वृश्चिक राशीसाठी सर्जनशीलता वाढण्याची शक्यता आहे.

धनु राशीच्या व्यक्तींनी मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल. मकर राशीसाठी संवाद आणि कुटुंबीयांशी समन्वय महत्त्वाचा ठरेल. कुंभ राशींसाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास आणि आकर्षण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT