Trigrahi Yog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Trigrahi Yog 2026 October: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

Trigrahi Yog Benefits: अक्टोबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या महिन्यात तुळ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र हे तीन प्रमुख ग्रह एकाच वेळी एकत्र येणार आहेत.

Manish Jadhav

Trigrahi Yog Benefits: अक्टोबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या महिन्यात तुळ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र हे तीन प्रमुख ग्रह एकाच वेळी एकत्र येणार आहेत. या तिन्ही ग्रहांच्या युतीमुळे 'त्रिग्रही योग' निर्माण होत आहे. तसेच सूर्य आणि बुधाच्या एकत्र येण्याने 'बुधादित्य राजयोग', तर सूर्य आणि शुक्राच्या युतीने 'शुक्रादित्य राजयोग' तयार होणार आहे.

शनिवार, 17 अक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी सूर्यदेव कन्या राशीतून बाहेर पडून तुळ राशीत प्रवेश करतील. तुळ राशीत बुध आणि शुक्र ग्रह आधीपासूनच उपस्थित असल्यामुळे सूर्य गोचर होताच हा 'त्रिग्रही योग' लगेच सक्रिय होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धी आणि व्यापाराचा कारक मानला जातो, शुक्र हा सुख-समृद्धी आणि वैभवाचा कारक आहे, तर सूर्य हा मान-सन्मान आणि आत्मविश्वासाचा देव मानला जातो. त्यामुळे या तिन्ही ग्रहांची युती काही राशींच्या लोकांसाठी प्रगतीचे आणि आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडणारी ठरेल.

सिंह राशी (Leo): सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. त्रिग्रही योगामुळे सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. दीर्घकाळापासून अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळाल्यामुळे आर्थिक फायदा होईल. जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अतिशय उत्तम आहे.

तुळ राशी (Libra): हा त्रिग्रही योग तुळ राशीतच तयार होत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदान ठरु शकतो. 17 अक्टोबरनंतर तुमच्या करिअरला (Career) नवी दिशा मिळेल. नोकरीपेशा लोकांना पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ खूप मजबूत राहील.

मकर राशी (Capricorn): मकर राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ आहे. नोकरीत नवीन आणि चांगल्या संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी यश मिळाल्यामुळे आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'RGP'तील वाद चिघळला! वीरेश बोरकर पक्षाचे नाव, चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची तयारी

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT