Lucky Zodiac Signs 2026: आज (25 जून) ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अत्यंत पवित्र अशी 'निर्जला एकादशी' साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात एकादशी तिथी आणि गुरुवार हे दोन्ही दिवस जगतपालनकर्ता भगवान विष्णूंना समर्पित असल्याने आजचा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या महात्वाचा आहे. विशेष म्हणजे, आज निर्जला एकादशीसोबतच 'गायत्री जयंती' देखील साजरी होत आहे.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत दुर्मिळ ठरला, कारण या दिवशी रवी योगासोबतच स्वाती आणि विशाखा नक्षत्र, तसेच शिव आणि सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला. ग्रहांच्या स्थितीचा विचार केल्यास आज चंद्र तूळ राशीत, मंगळ वृषभेत, सूर्य मिथुनेत, गुरु, बुध आणि शुक्र कर्क राशीत, केतू सिंहेत, राहु कुंभात आणि शनी मीन राशीत विराजमान आहेत.
ग्रहांच्या या विशेष मांडणीमुळे आज 'गजलक्ष्मी योग' आणि 'लक्ष्मी नारायण योग' निर्माण होत आहेत. या पवित्र व्रताच्या आणि ज्योतिषीय महासंयोगाच्या प्रभावामुळे सर्वच राशींवर परिणाम होणार असला, तरी काही ठराविक राशींसाठी हा काळ 'गेमचेंजर' ठरणार असून त्यांची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे.
या भाग्यशाली राशींमध्ये पहिली रास म्हणजे कर्क रास होय. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी पैसा आणि करिअर या दोन्ही आघाड्यांवर अत्यंत आनंदाची बातमी मिळू शकते. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना नवीन क्लायंट किंवा मोठी ऑर्डर मिळून फायदा होईल. विशेषतः कंटेंट क्रिएटर, फ्रीलांसर आणि ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांची व्याप्ती वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेवाईकांशी असलेले वाद मिटतील. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शक मिळेल, मात्र गुंतवणूक किंवा बँकिंगशी संबंधित निर्णय घेताना घाईगडबड करणे टाळावे.
दुसरी भाग्यवान रास म्हणजे सिंह रास असून, या राशीच्या जातकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या कामांना आता गती मिळेल आणि एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीमुळे मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायातील नवीन योजना उत्तम फळ देतील आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत खुले होतील. सरकारी कामे किंवा अडकलेल्या फाईल्स पुढे सरकतील. घरातील गैरसमज दूर होऊन मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल. विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल, तसेच सामाजिक पातळीवर तुमचा मान-सन्मान वाढेल. आरोग्य उत्तम राहील आणि एखाद्या गरजवंताला मदत केल्याने मानसिक शांतता लाभेल.
तिसरी रास असणाऱ्या तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर उत्तम ऑफर मिळू शकते. मुलाखत देणाऱ्या उमेदवारांचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात जनसंपर्काचा मोठा फायदा होईल आणि जुने संपर्क अचानक मदतीला येतील.
सोशल मीडिया (Social Media), मार्केटिंग आणि डिजिटल क्षेत्राशी संबंधित लोकांना उत्तम यश मिळेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भाडेकरु, मालमत्ता किंवा कागदपत्रांशी संबंधित असलेले जुने वाद मार्गी लागतील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारेल. भगवान विष्णूंच्या कृपेने या राशींची आर्थिक स्थिती कमालीची उंचावणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.