Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Navpancham Rajyog: 2026 मध्ये तीन वेळा 'नवपंचम राजयोग'! 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल; गुंतवणुकीतून मिळणार तगडा फायदा

Navpancham Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार नववर्षात (2026) अनेक ग्रहांच्या गतीमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत, ज्यामध्ये शनि महाराजांचे गोचर लक्षणीय ठरेल.

Manish Jadhav

Navpancham Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार नववर्षात (2026) अनेक ग्रहांच्या गतीमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत, ज्यामध्ये शनि महाराजांचे गोचर लक्षणीय ठरेल. 2026 मध्ये शनि ग्रह आपली रास बदलणार नसला तरी तो तीन वेळा नक्षत्र बदलून गोचर करणार आहे. यासोबतच वर्षभरात तीन वेळा 'नवपंचम राजयोग' नावाचा अत्यंत शुभ योग तयार होणार आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे वर्षभर काही राशींना मोठे लाभ आणि सुख-समृद्धी मिळण्याची शक्यता ज्योतिष तज्ज्ञांनी व्यक्त केली.

2026 मध्ये शनिचा नक्षत्र प्रवेश

द्रिक पंचांगानुसार, 2026 मध्ये शनि ग्रह दोन वेगवेगळ्या नक्षत्रांमध्ये तीन वेळा प्रवेश करेल. शनि ग्रह 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी आणि त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. या दोन गोचरांच्या दरम्यान, 17 मे रोजी दुपारी 3 वाजून 49 मिनिटांनी शनि महाराज रेवती नक्षत्रात गोचर करतील. या नक्षत्र बदलांव्यतिरिक्त, 2026 मध्ये शनि ग्रह वेगवेगळ्या राशींसोबत मिळून तीन वेळा 'नवपंचम राजयोग' तयार करेल, ज्याचा प्रभाव खालील तीन राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल.

नवपंचम राजयोगाचा 'या' राशींवर शुभ प्रभाव

1. वृषभ राशी (Vrishabha Rashi)

2026 मध्ये शनिचा नक्षत्र गोचर आणि तीन वेळा होणारा 'नवपंचम राजयोग' वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभप्रद आणि फलदायी ठरणार आहे. वर्षभर शनि महाराज तुमच्या राशीच्या लाभ भावात भ्रमण करतील, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक (Investment) केली, तर ती निश्चितपणे नुकसानकारक ठरणार नाही. तुमच्या कौटुंबिक आणि इतर संबंधांमध्ये प्रेम आणि गोडवा टिकून राहील. तुम्ही आपल्या प्रत्येक नात्यात आपलेपणाने वागाल आणि त्या बदल्यात तुम्हालाही सन्मान व आपुलकी मिळेल.

2. कर्क राशी (Karka Rashi)

शनिदेवांची कृपा आणि 'नवपंचम राजयोग' यांच्या दुहेरी प्रभावाने 2026 मध्ये कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या अनेक समस्यांमधून मुक्ती मिळेल. वर्षभर शनि महाराज तुमच्या कुंडलीतील नवव्या भावात राहतील. हे स्थान शुभ फळ देणारे मानले जाते. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल, ज्यामुळे तुमची अडलेली कामे आपोआप पूर्ण होतील आणि कार्यसिद्धी होईल. याशिवाय, तुमच्या काही अधूरी किंवा बिघडलेल्या प्रकल्पांवर किंवा कामांवर 2026 मध्ये पडदा पडेल आणि ती पूर्ण होतील. या वर्षात तुमचा कल अध्यात्माकडे राहील. यामुळे तुम्हाला केवळ मानसिक शांतीच मिळेल असे नाहीतर आध्यात्मिक प्रगती देखील साधता येईल.

3. कुंभ राशी (Kumbha Rashi)

शनिचे तीन वेळा नक्षत्र परिवर्तन करणे आणि तीन वेळा 'नवपंचम राजयोग' जुळल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत चांगले आणि प्रगतीकारक असेल. 2026 मध्ये शनि महाराज तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात संचार करतील, ज्यामुळे तुमच्या पैशांशी संबंधित समस्या दूर होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. जे लोक समाजसेवा किंवा समाजहितकारक कार्य करतात, त्यांच्या पदावर आणि समाजात प्रतिष्ठेमध्ये मोठी वाढ होईल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या जुनाट मालमत्तेतून किंवा गुंतवणुकीतून फायदा मिळण्यास सुरुवात होईल. कुटुंबात यावर्षी प्रेम टिकून राहील. तसेच, तुम्हाला तुमच्या जुन्या चुका सुधारण्याची आणि बिघडलेले संबंध पुन्हा सुधारण्याची उत्तम संधी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT