Navpancham Rajyog Dainik Gomantak
Horoscope

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Navpancham Rajyog 2026: आज 5 मार्च 2026, गुरुवारची रात्र खगोलप्रेमी आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Manish Jadhav

Navpancham Rajyog Astrology Prediction : आज 5 मार्च 2026, गुरुवारची रात्र खगोलप्रेमी आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. रात्री 10 वाजून 41 मिनिटांनी अवकाशात सूर्य आणि गुरु ग्रह एकमेकांपासून नेमक्या 120 अंशांच्या अंतरावर येणार आहेत. ग्रहांच्या या विशिष्ट स्थितीमुळे ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 'नवपंचम राजयोगा'ची निर्मिती होत आहे.

जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून पाचव्या आणि नवव्या भावात स्थित असतात, तेव्हा या राजयोगाचा उदय होतो. सूर्य आणि गुरु या दोन प्रभावी ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे हा योग अधिक फलदायी मानला जातो, ज्याचा सकारात्मक परिणाम प्रामुख्याने तीन राशींच्या जातकांवर दिसून येणार असून त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत.

या राजयोगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या जातकांसाठी सुवर्णकाळ सुरु होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या राशीच्या व्यक्तींना नशिबाची भक्कम साथ लाभणार असून हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः नोकरी आणि व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील. व्यापारातही आर्थिक वृद्धीचे योग असून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल.

दुसरीकडे, कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि सूर्याचा हा नवपंचम राजयोग करिअरमध्ये मोठी भरभराट घेऊन येईल. नोकरीत असलेल्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, ज्याचे भविष्यकाळात अत्यंत शुभ परिणाम मिळतील. उद्योजकांसाठी हा काळ जबरदस्त नफा कमावण्याचा ठरेल, नवीन गुंतवणूक (Investment) करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. केवळ व्यावसायिकच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातही याचे सकारात्मक पडसाद उमटतील. विशेषतः 'लव्ह लाईफ' किंवा प्रेमसंबंधांमध्ये सुसंवाद वाढेल आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

मकर राशीच्या जातकांसाठी देखील हा राजयोग भाग्योदयाचा ठरणार असून त्यांना अचानक धनलाभाची संधी मिळू शकते. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना रोजगाराच्या नवीन आणि प्रतिष्ठित संधी प्राप्त होतील. व्यापार क्षेत्रात सक्रिय असलेल्या लोकांसाठी एखादी मोठी व्यावसायिक डील फायनल होऊ शकते, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. एकूणच, आज रात्री निर्माण होणारा हा नवपंचम राजयोग या तीन राशींच्या आयुष्यात प्रगती, समृद्धी आणि चैतन्य घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT