Budh Vakri 2026 Dainik Gomantak
Horoscope

Budh Vakri 2026: 23 दिवसांचा 'राजयोग'! बुधाची वक्री चाल पालटणार 'या' 3 राशींचं आयुष्य; 21 मार्चपर्यंत बरसणार पैशांचा पाऊस

Scorpio Zodiac Benefits: ज्योतिष शास्त्रात ग्रहांचा राजकुमार मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाने गुरुवारी (26 फेब्रुवारी 2026) दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी कुंभ राशीत वक्री चाल सुरु केली.

Manish Jadhav

Scorpio Zodiac Benefits: ज्योतिष शास्त्रात ग्रहांचा राजकुमार मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाने गुरुवारी (26 फेब्रुवारी 2026) दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी कुंभ राशीत वक्री चाल सुरु केली. बुध ग्रहाची ही अवस्था 21 मार्च 2026 पर्यंत, म्हणजेच एकूण 23 दिवस राहणार आहे. बुध हा ग्रह बुद्धी, व्यापार, तर्कशक्ती, वाणी आणि त्वचेच्या आरोग्याचा कारक मानला जातो. जेव्हा हा ग्रह वक्री होतो, तेव्हा सर्व 12 राशींच्या जीवनावर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतात. मात्र, या काळात विशेषतः तीन राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आणि प्रगतीकारक ठरणार आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाची ही वक्री चाल भाग्योदयाची ठरणार आहे. कर्क राशीच्या कुंडलीत नवव्या भावात बुध वक्री झाला असून, हा भाव भाग्य, धर्म, वडील आणि उच्च शिक्षणाशी (Education) संबंधित आहे. यामुळे आगामी 23 दिवसांत कर्क राशीच्या जातकांना नशिबाची उत्तम साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि वडिलांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. जर वडिलांच्या प्रकृतीबाबत काही चिंता असतील, तर त्या दूर होऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाची नवीन शिखरे गाठता येतील.

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी बुधाचा हा बदल पाचव्या भावात झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पाचवा भाव हा बुद्धी, प्रेमसंबंध, शिक्षण आणि संतानाशी संबंधित असतो. या काळात वृश्चिक राशीच्या अविवाहित व्यक्तींचे विवाह जमण्याचे योग प्रबळ आहेत. नोकरी-व्यवसायात असलेल्या लोकांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये (Career) स्थिरता येईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांची एकाग्रता वाढेल आणि मानसिक तणाव कमी होईल. तसेच, अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या दांपत्यांना या काळात आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठी तर हा काळ सर्वाधिक शुभ असेल, कारण बुध तुमच्या राशीतच वक्री झाला असून त्याचा प्रभाव दुसऱ्या भावात पडत आहे. दुसरा भाव हा धन, वाणी, कुटुंब आणि संपत्तीचा कारक मानला जातो. या काळात तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि व्यवहारचातुर्य वाढेल, ज्याच्या जोरावर तुम्ही कार्यक्षेत्रात मोठी उपलब्धी मिळवू शकाल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या समाधानी राहाल. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत मजबूत असेल. जुनी देणी पूर्ण होतील आणि संपत्तीशी संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण होईल. थोडक्यात, 21 मार्चपर्यंत या तीन राशींच्या लोकांसाठी बुधाची वक्री चाल प्रगतीचे नवे मार्ग खुले करणारी ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT