Navpancham Rajyog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

Mars Saturn Navpancham Rajyog October 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, 16 ऑक्टोबर रोजी मंगळ आणि शनि एका अत्यंत महत्त्वाच्या युतीत प्रवेश करणार आहेत.

Manish Jadhav

Mars Saturn Navpancham Rajyog October 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, 16 ऑक्टोबर रोजी मंगळ आणि शनि एका अत्यंत महत्त्वाच्या युतीत प्रवेश करणार आहेत. या दिवशी दुपारी 1 वाजून 58 मिनिटांनी मंगळ आणि शनि ग्रह एकमेकांपासून 123 अंशांच्या अंतरावर येत 'नवपंचम राजयोग' तयार करत आहेत. या विशेष राजयोगाच्या निर्मितीमुळे अनेक राशींच्या जातकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. विशेषतः कर्क, कन्या आणि कुंभ या तीन राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार असून त्यांच्या आर्थिक प्रगतीचे अनेक नवे मार्ग खुले होणार आहेत. या काळात मंगळ ग्रह कर्क राशीत गुरुसोबत विराजमान असेल, तर शनि ग्रह मीन राशीत उपस्थित राहून हा योग अधिक प्रभावशाली बनवणार आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठी हा नवपंचम राजयोग करिअरमध्ये मोठे यश घेऊन येणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत अनुकूल असणार असून कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे भरभरुन कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. याशिवाय तुमचे अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असून आर्थिक आवक सुधारल्याने मन प्रसन्न राहील.

दुसरीकडे, कन्या राशीच्या जातकांसाठी कमाईचे नवीन आणि भरभराट देणारे मार्ग खुले होणार आहेत. उत्पन्नात (Income) मोठी वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. तुम्ही केलेल्या कष्टाचे आणि मेहनतीचे उत्तम फळ तुम्हाला मिळेल, तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा कमावता येईल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा शनि आणि मंगळाचा हा नवपंचम योग अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या वर्गासाठी हा काळ सुवर्णकाळ मानला जात आहे. व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून नवीन प्रोजेक्टमध्ये यश मिळू शकते. नोकरीत बढती किंवा उत्पन्नात वाढ होण्याचे योग जुळून येत आहेत. एकंदरीत, 16 ऑक्टोबर रोजी जुळून येणारा हा नवपंचम राजयोग कर्क, कन्या आणि कुंभ राशीच्या आयुष्यात सुख-समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि भरभराट घेऊन येणार असून ग्रहांची ही स्थिती या राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BSF Soldiers Attcak: भारत-बांगलादेश सीमेवर तस्करांचा उच्छाद! जमावाकडून बीएसएफ जवानांवर जीवघेणा हल्ला; 3 जखमी, 8 अटकेत VIDEO

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी आमदार मायकल लोबोंना न्यायालयाची नोटीस; बाऊन्सर तैनात केल्याचा आरोप

रोहित शर्मा दुसऱ्यांदा लग्न करणार? वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 'हिटमॅन' काहीही करायला तयार

Goa Politics: 'काँग्रेसमध्ये उमेदवारी विकण्याची जुनी खोड'; चर्चिल आलेमाव यांचा गंभीर आरोप, विजयाबाबतही इशारा

America Strikes Qeshm Island: केशम बेटावरील स्फोटांनी हादरले इराण! मतदानाच्या दिवशीच अमेरिकेकडून लष्करी कारवाई; 'आत्मरक्षणासाठी' हल्ला केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT