Rashi Bhavishya Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya: बम बम भोले! भगवान शंकर देणार आशीर्वाद; 'या' राशींसाठी सुवर्णयोग

Rashi Bhavishya 15 February: व्यातीपात, वरीयान, सर्वार्थ सिद्धी, आडल आणि विडाल योगांचा दुर्मिळ संयोग जुळत असून मंगळ, बुध आणि चंद्र यांचे गोचरही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Sameer Panditrao

द्रिक पंचांगानुसार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भगवान महादेव यांना अर्पित महाशिवरात्री साजरी होत आहे. या दिवशी व्यातीपात, वरीयान, सर्वार्थ सिद्धी, आडल आणि विडाल योगांचा दुर्मिळ संयोग जुळत असून मंगळ, बुध आणि चंद्र यांचे गोचरही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ग्रहस्थितीचा सर्व १२ राशींवर वेगवेगळा प्रभाव दिसून येईल.

मेष: व्यवसायात मंदीची भावना राहू शकते. नोकरीत घाईगडबडीत निर्णय टाळा; मात्र दिवसाअखेरीस आनंदवार्ता मिळेल.

वृषभ: समाजात कौतुक होईल. धार्मिक कार्यात रस वाढेल आणि मानसिक समाधान लाभेल.

मिथुन: दिवसाची सुरुवात तणावपूर्ण; पोटदुखीचा त्रास संभवतो. आर्थिक बाबतीत मात्र स्थैर्य राहील.

कर्क: अपेक्षित काम पूर्ण होईल. आरोग्यात सुधारणा आणि विवाहातील अडथळे दूर होण्याची शक्यता.

सिंह: नवीन व्यावसायिक प्रस्ताव लाभदायक. मालमत्ता खरेदीचा विचार पुढे जाईल. पालकांशी संवाद उपयुक्त ठरेल.

कन्या: महत्त्वाचे काम टाळल्यास आर्थिक तोटा. मौल्यवान वस्तू जपून ठेवा. प्रेमजीवनातील तणाव कमी होईल.

तूळ: चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल; आरोग्य सुधारेल.

वृश्चिक: कमाईच्या संधी वाढतील. मानसिक शांती लाभेल. विवाह विषयक निर्णय घेण्यासाठी योग्य काळ.

धनु: भागीदारीत काम फायदेशीर. आरोग्य चांगले; पण खर्च वाढू शकतो.

मकर: मान-सन्मान वाढेल. मुलाखतीत यश आणि आर्थिक लाभाचे संकेत.

कुंभ: हट्टीपणामुळे वरिष्ठ नाराज होऊ शकतात. व्यवसायात सावधगिरी बाळगा. वैवाहिक संभ्रम वाढेल.

मीन: कामात विलंब आणि खर्च वाढ. सायंकाळी घशाशी संबंधित त्रास संभवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT