Ketu Nakshatra Parivartan Dainik Gomantak
Horoscope

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

Ketu Gochar March to December 2026: केतु ग्रहाचा मघा नक्षत्रातील प्रवेश काही राशींसाठी कसोटीचा काळ घेऊन आला आहे. 29 मार्चपासून सुरु झालेला हा गोचर काळ 5 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे.

Manish Jadhav

Ketu Transit in Magha Nakshatra 2026: केतु ग्रहाचा मघा नक्षत्रातील प्रवेश काही राशींसाठी कसोटीचा काळ घेऊन आला आहे. 29 मार्चपासून सुरु झालेला हा गोचर काळ 5 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. केतु हा एक छाया ग्रह आणि 'पाप ग्रह' मानला जात असल्याने या नक्षत्रातील त्याचे वास्तव्य विशेषतः चार राशींच्या जातकांसाठी मानसिक आणि आर्थिक स्तरावर अडचणी निर्माण करु शकते. या काळात धनहानीची शक्यता असल्याने गुंतवणुकीचे निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आणि विचारपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे.

वृषभ राशीच्या लोकांसाठी केतुचे हे गोचर आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये सतर्कतेचा इशारा देत आहे. या काळात अचानक खर्च वाढण्याची शक्यता असून नियोजन न केलेल्या गुंतवणुकीमुळे आर्थिक फटका बसू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचा ओढाताण वाढल्याने मानसिक थकवा जाणवू शकतो. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई न करता, त्यातील तांत्रिक बाबी पुन्हा एकदा तपासून पाहणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल.

सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेषतः संघर्षमयी राहण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिक आणि आर्थिक आघाडीवर केतु अडथळे निर्माण करु शकतो. मोठे आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करताना सावध राहा, अन्यथा नुकसान सोसावे लागेल. या गोचरमुळे मानसिक अस्थिरता वाढू शकते आणि कौटुंबिक जीवनातही काही प्रमाणात मतभेद किंवा कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. संयम राखणे हाच या काळातील सर्वोत्तम उपाय ठरेल.

धनु राशीच्या व्यक्तींना या काळात अनपेक्षित संकटांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक नुकसानीसोबतच वैयक्तिक आयुष्यात तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. प्रवासाचे नियोजन किंवा नवीन प्रकल्प सुरु करताना त्यात वारंवार अडथळे येऊ शकतात. धैर्य गमावून चालणार नाही; प्रत्येक पाऊल रणनीती आखून आणि विचारपूर्वक उचलणे अनिवार्य आहे.

मीन राशीसाठीही हा गोचर काळ संघर्षाचा ठरेल. तुमच्या आर्थिक स्थितीत आणि वैयक्तिक आयुष्यात अस्थिरता जाणवेल. अचानक उद्भवणारे खर्च आणि गुंतवणुकीतील (Investment) जोखीम यामुळे आर्थिक नियोजन कोलमडू शकते. निर्णय घेताना गोंधळ उडण्याची किंवा द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता आहे. मित्र आणि कुटुंबासोबतच्या संबंधांमध्ये दुरावा येणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. एकूणच, या चारही राशींच्या जातकांनी 5 डिसेंबरपर्यंत मानसिक शांततेवर लक्ष केंद्रित करुन सावधगिरीने व्यवहार करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

खरी कुजबुज: कोण कुणाला मतदान करतो?

VIDEO: पाकड्यांच्या क्रिकेटचा खेळखंडोबा! वाऱ्याच्या एका झटक्यानं पीचवरील कव्हर्स उडाले अन् ग्राऊंड्समनही तोंडावर पडले, पाहा व्हिडिओ

Russian Military Plane Crash: संपर्क तुटला अन् क्षणातच होत्याचं नव्हतं झालं! रशियाचं 'An-26' लष्करी विमान क्रिमियात कोसळलं; 29 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT