Kaalsarp Yog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Kaalsarp Yog 2026: कालसर्प योगाचा अक्राळविक्राळ विळखा! मे महिन्यात 'या' लोकांसाठी धोक्याची घंटा; घाईने घेतलेले निर्णय ठरणार घातक

Negative Effects of Kaalsarp Yog: मे 2026 मध्ये असाच एक काळ येत असून, सुमारे 15 दिवस कालसर्प योगाचा प्रभाव राहणार आहे. या योगाच्या अशुभ फेऱ्यातून प्रामुख्याने पाच राशींना स्वतःचा बचाव करणे कठीण जाणार आहे.

Manish Jadhav

Kaalsarp Yog May 2026: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीतील बदल मानवी जीवनावर परिणाम करत असतात. यामध्ये 'कालसर्प योग' हा अत्यंत प्रभावशाली आणि अनेकदा अशुभ फळ देणारा योग मानला जातो. मे 2026 मध्ये असाच एक काळ येत असून, सुमारे 15 दिवस कालसर्प योगाचा प्रभाव राहणार आहे. या योगाच्या अशुभ फेऱ्यातून प्रामुख्याने पाच राशींना स्वतःचा बचाव करणे कठीण जाणार आहे. 11 मे ते 26 मे 2026 या कालावधीत हा कालसर्प योग सक्रिय असेल. जेव्हा राहू आणि केतू या दोन छाया ग्रहांच्या मध्ये इतर सर्व सात ग्रह येतात, तेव्हा कालसर्प योगाची निर्मिती होते. चला तर मग या काळात नेमक्या कोणत्या पाच राशींनी सावध राहणे गरजेचे आहे आणि त्यांच्यावर काय परिणाम होतील याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आव्हानात्मक ठरु शकतो. पायाला दुखापत होण्याची शक्यता असल्याने प्रवासात किंवा दैनंदिन कामात काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्यावरही (Health) याचा परिणाम होईल, ज्यामुळे चिडचिड वाढू शकते. करिअरच्या आघाडीवर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ फारसा अनुकूल नाही. एखाद्या षडयंत्राचा तुम्ही बळी ठरु शकता, ज्यामुळे तुमच्या प्रतिमेला तडा जाण्याची भीती आहे.

कन्या राशीच्या व्यावसायिकांनी या काळात विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. नवीन भागीदारांवर आंधळा विश्वास ठेवणे महागात पडू शकते, कारण ते तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. आरोग्याच्या जुन्या तक्रारी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियमित तपासणी आणि औषधोपचारांकडे दुर्लक्ष करु नका. तुमचे विरोधक तुमच्या विरोधात गुप्त हालचाली करु शकतात, त्यामुळे गुप्तता पाळणे हिताचे ठरेल.

धनु राशीच्या तरुणांच्या मनात या काळात अनामिक भीती राहील. या भीतीचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. नोकरीपेशा जातकांनी या 15 दिवसांत कोणालाही कर्ज देणे टाळावे, अन्यथा दिलेले पैसे परत मिळण्यात अडचणी येतील. मानसिक शांततेसाठी योगासने किंवा ध्यानधारणेचा आधार घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मकर राशीच्या व्यक्तींना मानसिक तणावातून सुटका मिळणे कठीण जाईल, ज्यामुळे घरातील वातावरणही बिघडू शकते. विशेषतः तरुणांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. व्यावसायिकांनी या काळात नवीन कर्ज घेण्यापासून लांब राहावे, कारण घेतलेले कर्ज फेडताना मोठी कसरत करावी लागेल आणि त्यात नुकसानीची शक्यता अधिक आहे.

मीन राशीवरही या कालसर्प योगाचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. आरोग्यामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याने खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. या 5 राशींनी मे महिन्याच्या उत्तरार्धात अत्यंत संयमाने आणि सावधगिरीने वागणे त्यांच्या हिताचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 10 वर्षांऐवजी दर 5 वर्षांनी पगारवाढीचा प्रस्ताव; आठव्या वेतन आयोगासमोर महत्त्वाची मागणी

Mapusa Road Repair: निवडणुका जवळ येताच म्हापशात विकासाचा 'पाऊस', रस्ते कामाला प्रारंभ; 15 वर्षांपासून तुंबलेली गटारे 8 दिवसांत साफ

Anjunem Dam Water Supply: अंजुणेत 21 टक्के जलसाठा! सिंचन, पिण्यासाठी सांभाळून पुरवठा; प्रशासनाकडून नियोजनावर भर!

Goa Atal Asra Scheme : 'अटल आसरा' योजनेत आदिवासींसाठी मोठी वाढ; आता घर बांधणीसाठी मिळणार 5 लाख! सावंत सरकारचा निर्णय

Old Zuari Bridge Closure: प्रवाशांनो लक्ष द्या! शनिवारी जुना झुआरी पूल राहणार बंद, नियमित तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय; पर्यायी मार्गाचा करा वापर

SCROLL FOR NEXT