Guru Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Lucky Zodiac Signs: नशिबाची भक्कम साथ अन् अपार धनलाभ! 12 वर्षांनंतर गुरुचा दुर्मिळ योग! 6 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Jupiter Transit in Cancer Benefits: ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु ग्रहाला (बृहस्पती) अतिशय शुभ, ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचा कारक मानला जातो.

Manish Jadhav

Guru Gochar 2026 Financial Gain: ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु ग्रहाला (बृहस्पती) अतिशय शुभ, ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचा कारक मानला जातो. जेव्हा गुरु ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. गुरु ग्रहाचे हे उच्च राशीतील गोचर अनेक राशींसाठी अत्यंत वरदान आणि फायदेशीर ठरणार आहे. या बदलामुळे मेष आणि कर्क राशीसह एकूण 6 राशींच्या जातकांना भाग्याची भक्कम साथ लाभणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल आणि त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या शुभ बदलांबद्दल.

चंद्राची मालकी असलेल्या कर्क राशीमध्ये गुरुचे हे गोचर मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतीकारक ठरेल. तुमच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून चाललेल्या पैशांशी संबंधित सर्व समस्या आता संपुष्टात येतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल. एवढेच नाही तर तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये आणि उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, ज्या कर्क राशीमध्ये गुरुचे हे गोचर होत आहे, त्या स्वतः कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला मोठा धनलाभ होईल. तुम्ही भूतकाळात केलेल्या कष्टांचे आणि प्रामाणिक मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला या काळात मिळेल, ज्यामुळे तुमचे मन समाधानी राहील.

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुचा कर्क राशीतील हा प्रवेश अत्यंत फलदायी आणि आनंददायी ठरेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे अनेक नवीन मार्ग आणि उत्तम संधी उपलब्ध होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा नवीन नोकरी शोधण्याचा विचार करत असाल, तर हा काळ त्यासाठी अतिशय उत्तम आणि अनुकूल आहे. या संपूर्ण काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. दुसरीकडे, तुळ राशीच्या जातकांच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. ऑफिस किंवा कार्यक्षेत्रात तुम्हाला एखादी मोठी आणि नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे वर्चस्व वाढेल. बऱ्याच काळापासून रेंगाळलेली किंवा अडकलेली कामे या काळात यशस्वीपणे पूर्ण होतील आणि तुमच्यासाठी यशाचे उत्तम योग निर्माण होतील.

वृश्चिक राशीच्या जातकांना गुरुच्या या गोचरामुळे प्रचंड आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यापार दोन्ही क्षेत्रात तुम्हाला धनलाभाचे उत्तम योग आहेत. तुमची आर्थिक मिळकत (Income) वाढेल, ज्यामुळे तुमची बचतही वाढेल. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य लाभेल. शेवटी, मीन राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे संक्रमण अत्यंत शुभ संकेत घेऊन आले आहे. तुमच्या करिअरमध्ये (Career) यशाच्या नवीन संधी मिळण्यासोबतच समाजात तुमचे मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या जीवनात पैशांशी संबंधित जी काही अडचण किंवा तणाव सुरु होता, तो आता पूर्णपणे संपेल आणि मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता बळावेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT