मेष: आज तुमच्या कामाचा वेग वाढेल आणि कठीण वाटणारी कामे सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबात तुमच्या मताला आज विशेष महत्त्व दिले जाईल.
वृषभ: व्यापारात नवीन करार होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होऊ शकतो. आरोग्याची थोडी काळजी घ्या, विश्रांतीची गरज भासेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मधुर होईल.
मिथुन: आज एखादा जुना वाद मिटल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. नवीन लोकांशी झालेली ओळख भविष्यात फायदेशीर ठरेल. प्रवासाचे योग असून त्यातून कामाचे नवीन मार्ग शोधाल.
कर्क: आजचा दिवस घरातील कामांत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यात जाईल. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. नवीन मालमत्ता खरेदीचे विचार सुरू होतील. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील.
सिंह: तुमच्या साहसी निर्णयांचे आज कौतुक होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. सामाजिक सन्मान वाढेल. एखादी महत्त्वाची माहिती मिळाल्याने तुमच्या व्यवसायात फायदा होईल.
कन्या: विखुरलेली कामे मार्गी लावण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा, पण महत्त्वाच्या कामात कंजूसी करू नका. आरोग्यात सुधारणा होईल.
तूळ: आजचा दिवस खरेदी आणि फिरण्यासाठी उत्तम आहे. वैयक्तिक नात्यांमधील दुरावा मिटेल. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा, फायदा होईल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल.
वृश्चिक: तुमच्या मार्गात येणारे अडथळे तुम्ही तुमच्या हुशारीने दूर कराल. विरोधक आज माघार घेतील. कायदेशीर प्रकरणांमध्ये सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे. तब्येत सुधारेल.
धनु: आज नशीब तुमच्या बाजूने आहे. अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
मकर: कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान अधिक भक्कम होईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्यात सुधारणा होईल. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने हालचाली होतील.
कुंभ: आज तुम्हाला करिअरमध्ये नवीन आणि आकर्षक संधी चालून येतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन विचारांमुळे कामात प्रगती होईल.
मीन: कुटुंबाकडून एखादी आनंदाची बातमी समजेल. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल. अध्यात्माकडे कल वाढेल. आर्थिक व्यवहारात मात्र थोडी सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.