Horoscope Today August 9, 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: नशिबाची तिजोरी उघडणार! श्रावण एकादशीच्या दिवशी 'या' राशींना मिळणार विशेष लाभ; अचानक धनप्राप्तीची शक्यता

Horoscope Today August 9, 2026: श्रावण महिन्यातील एकादशीला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. आज, 9 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी असून या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची उपासना केली जाते.

Sameer Amunekar

श्रावण महिन्यातील एकादशीला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. आज, 9 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी असून या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची उपासना केली जाते. आज एकादशी तिथी सकाळी 11 वाजून 6 मिनिटांपर्यंत राहणार आहे. त्यानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल. तसेच रात्री 2 वाजून 5 मिनिटांपर्यंत हर्षण योगाचा प्रभाव राहणार असून दुपारी 2 वाजून 44 मिनिटांपर्यंत मृगशिरा नक्षत्र असेल. या ग्रहस्थितीचा काही राशींना सकारात्मक फायदा मिळण्याची शक्यता आहे.

मेष : आर्थिक बाबतीत चांगली प्रगती

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सकारात्मक ठरू शकतो. आर्थिक नियोजनातून भविष्यात फायदा मिळण्याचे संकेत आहेत. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील, मात्र मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. स्पष्ट आणि प्रामाणिक बोलण्यामुळे कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत होईल. कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : मॅजेंटा | शुभ अंक : 5

वृषभ : जोडीदाराची मिळेल साथ

वृषभ राशीसाठी दिवस उत्साहवर्धक आहे. अनपेक्षित खर्चामुळे बजेट थोडे बिघडू शकते, पण कुटुंब किंवा जीवनसाथीची मदत मिळाल्याने परिस्थिती नियंत्रणात राहील. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतली जाऊ शकते.
शुभ रंग : हिरवा | शुभ अंक : 8

मिथुन : रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता

मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी मिळू शकते. जुन्या आर्थिक अडचणी, कर्ज किंवा थकीत रकमेबाबत दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून महत्त्वाची कामे पूर्ण करा. वैवाहिक जीवनात कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे प्रेम आणि जवळीक वाढू शकते.
शुभ रंग : सिल्व्हर | शुभ अंक : 2

कर्क : आर्थिक लाभाची संधी

कर्क राशीला आज सर्जनशील कामातून मानसिक समाधान मिळेल. मित्राच्या मदतीने आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे नवीन आणि प्रभावशाली व्यक्तींशी ओळख होऊ शकते. मात्र वैयक्तिक आयुष्यात एखाद्या जवळच्या व्यक्तीची उणीव जाणवू शकते.
शुभ रंग : लाल | शुभ अंक : 6

सिंह : नवीन सुरुवातीसाठी उत्तम दिवस

सिंह राशीसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल राहू शकतो. तुमच्या नम्र वागण्याचे कौतुक होईल. व्यवसाय विस्तारासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदतही मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील.
शुभ रंग : पिवळा | शुभ अंक : 7

कन्या : आत्मविश्वासाने काम करा

कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये आज नव्या उत्साहाची भावना निर्माण होईल. आपल्या कल्पना मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या व्यवस्थित पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल.
शुभ रंग : गोल्डन | शुभ अंक : 3

तुळ : मेहनतीचे मिळेल फळ

तुळ राशीला आज यशाचे संकेत आहेत. एखादे महत्त्वाचे काम चिकाटीने पूर्ण केल्यास चांगला परिणाम मिळू शकतो. आर्थिक सुरक्षिततेसाठी बचतीचा निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. मित्रांच्या माध्यमातून नवीन ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात संधी निर्माण होऊ शकतात.
शुभ रंग : नारंगी | शुभ अंक : 6

वृश्चिक : वरिष्ठांकडून कौतुक

वृश्चिक राशीसाठी दिवस उत्साहपूर्ण राहण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित काही त्रास कमी झाल्याने तुम्हाला अधिक सक्रिय वाटेल. घरातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. वरिष्ठांकडून मिळणारे कौतुक आत्मविश्वास वाढवेल. जुन्या मित्रांची भेटही आनंद देऊ शकते.
शुभ रंग : जांभळा | शुभ अंक : 9

धनु : नात्यांमध्ये गोडवा वाढेल

धनु राशीसाठी दिवस चांगला आहे. मित्रांसोबत वेळ घालवताना जबाबदाऱ्यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. मुलांच्या शिक्षणासाठी काही मोठा खर्च होऊ शकतो. कुटुंबातील मतभेद संवादातून दूर केल्यास कामे अधिक सहजपणे पूर्ण होतील. प्रेमसंबंध आणि नोकरीच्या ठिकाणीही सकारात्मक अनुभव येऊ शकतो.
शुभ रंग : निळा | शुभ अंक : 1

मकर : नवीन रोजगाराच्या संधी

मकर राशीच्या व्यक्तींना आज मानसिक ताण जाणवला तरी काम करण्याची क्षमता चांगली राहील. कठीण प्रसंगी मित्र आणि कुटुंबीयांचा आधार मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नवीन संधी समोर येऊ शकतात. प्रेमसंबंधातील जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : भूरा | शुभ अंक : 7

कुंभ : व्यवसायात लाभाचे संकेत

कुंभ राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. नम्रपणा आणि परिस्थितीनुसार बदलण्याची तयारी यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. कौटुंबिक नात्यांमध्ये जवळीक वाढेल. जमीन-जुमल्याशी संबंधित काही कामे मार्गी लागू शकतात. व्यवसायात फायदा आणि नोकरीत नवीन जबाबदारी किंवा उपलब्धी मिळण्याचे संकेत आहेत.
शुभ रंग : गुलाबी | शुभ अंक : 5

मीन : नव्या ओळखींचा फायदा

मीन राशीच्या व्यक्ती आज कुटुंबातील छोट्या-छोट्या आनंदाच्या क्षणांचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. खेळ, मनोरंजन किंवा बाहेरील उपक्रमांमुळे उत्साह वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे नवीन लोकांशी मैत्री होण्याची शक्यता आहे. मात्र अचानक बाहेर जावे लागल्याने एखादे महत्त्वाचे काम पुढे ढकलले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandar Surlkar Murder Case: मंदार सुर्लकर खूनप्रकरणी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; संशयितांची खंडपीठानं केली मुदतपूर्व सुटका

Goa ST Reservation: गोव्यात 'एसटी' आरक्षणाची केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी! चार मतदारसंघ राखीव, फळदेसाई-डिकॉस्टा-सिक्वेरा-कवळेकर यांचे राजकीय गणित बदलणार?

World Longest Hair Record: लांब केसांची भन्नाट क्रेझ! उत्तराखंडच्या महिलेनं रचला अनोखा रेकॉर्ड; केसांची लांबी पाहून तुम्हीही व्हाल थक्क Watch Video

खरी कुजबूज: आजारालाही वेळ ठरलेली?

Bikes Under 60000: कमी बजेटमध्ये घ्या शानदार बाईक! TVS, Heroसह 'या' बाईक्स देतील 70 kmpl पर्यंत जबरदस्त मायलेज; किंमतही खिशाला परवडणारी

SCROLL FOR NEXT