Horoscope 2 November 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope 2 November 2026: लाभ, प्रगती आणि संयमाची सांगड घालणारा आजचा दिवस!  'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; चंद्र-मंगळची युती ठरणार वरदान

Horoscope Today 2 November 2026: आज 2 नोव्हेंबर 2026, सोमवार हा दिवस ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. आज चंद्र आणि मंगळ कर्क राशीत एकत्र भ्रमण करत आहेत, तर देवगुरु बृहस्पती सिंह राशीत विराजमान आहेत.

Manish Jadhav

Horoscope Today 2 November 2026: आज 2 नोव्हेंबर 2026, सोमवार हा दिवस ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. आज चंद्र आणि मंगळ कर्क राशीत एकत्र भ्रमण करत आहेत, तर देवगुरु बृहस्पती सिंह राशीत विराजमान आहेत. ग्रहांच्या या स्थितीमुळे आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत लाभदायक आणि प्रगतीचा असणार आहे, तर काही राशींच्या जातकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य...

मेष राशी: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी स्वतःवर संयम ठेवणे गरजेचे आहे. नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली तरी कोणालाही अपशब्द बोलणे टाळा. जुने कर्ज फेडण्याची व्यवस्था होऊ शकते, ज्यामुळे तुमच्यावरील ताण हलका होईल. विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी काळ अनुकूल आहे. आरोग्याच्या दृष्टीने योग किंवा ध्यानधारणेचा समावेश करा.

वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मेहनतीचा असला तरी भविष्यात मोठे लाभ देणारा ठरेल. कामावर अधिक फोकस ठेवल्यास यश नक्की मिळेल. ऑफिस किंवा दुकानात ग्राहकांची वर्दळ वाढेल आणि आर्थिक लाभाचे योग जुळून येतील. संध्याकाळपर्यंत एखादी खूषखबर मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल.

मिथुन राशी: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. करिअरच्या आघाडीवर काही महत्त्वाची आणि चांगली बातमी मिळू शकते. तुमची बुद्धिमत्ता आणि कार्यनिष्ठा तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यास मदत करेल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास चांगला फायदा होईल. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल.

कर्क राशी: आज चंद्र आणि मंगळ तुमच्याच राशीत असल्यामुळे दिवस हुशारीने आणि योग्य नियोजनाने घालवावा लागेल. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवून कामे केल्यास अपेपेक्षा जास्त यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. संध्याकाळी मुलांकडून येणारी एखादी चांगली बातमी घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल.

सिंह राशी: देवगुरु बृहस्पती सिंह राशीत असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. बाहेरील लोकांशी झालेला संपर्क आणि नवीन ओळखी तुमच्या व्यावसायिक योजनांना गती देतील. नोकरीच्या ठिकाणी उच्चाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नोकरीत बदल किंवा नवीन संधी शोधत असलेल्यांना यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि जोडीदाराची साथ लाभेल.

कन्या राशी: गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा मानसिक ताण आज कमी होईल. सासरच्या मंडळींकडून काही खूषखबर किंवा उत्तम सहकार्य मिळू शकते. तुम्ही केलेली प्रामाणिक मेहनत आणि इतरांना दिलेली मदत आज तुमच्या कामी येईल. मुलांच्या यशाने मनाला समाधान आणि अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिष्ठा मजबूत होईल.

तुळ राशी: आजचा दिवस तुमच्यासाठी सुख-समाधानाचा असला तरी आर्थिक बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ऑफिसमध्ये टीमवर्कच्या सहाय्याने काम केल्यास उत्तम परिणाम मिळतील. तुमचा सौम्य स्वभाव आणि गोड बोलणे लोकांची मने जिंकेल, ज्यामुळे व्यावसायिक सौद्यांमधून चांगला नफा होईल.

वृश्चिक राशी: आजचा दिवस तुम्हाला अपेक्षेपेक्षा थोडी जास्त मेहनत मागणार आहे. व्यवसायात नफ्याची संधी मिळवण्यासाठी अधिक फोकस ठेवावा लागेल. दीर्घकाळ केलेल्या कष्टाचे फळ आता मिळण्यास सुरुवात होईल. उत्पन्न आणि मान-सन्मान यामध्ये वाढ होण्याचे उत्तम योग आहेत. जनसंपर्क वाढवल्यामुळे तुमची अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील.

धनु राशी: धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असून सहकाऱ्यांशी वादविवाद टाळून शांतपणे काम करणे हिताचे राहील. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छा आज पूर्ण होऊ शकतात. अचानक प्रवास घडल्यामुळे एखादे महत्त्वाचे काम फत्ते होईल. मात्र, कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला आवर्जून घ्या.

मकर राशी: मार्केटमधील तुमची चांगली प्रतिष्ठा आणि जुने व्यावसायिक संबंध आज नवीन कामांची संधी मिळवून देतील. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल किंवा कामाबद्दल सन्मान होण्याची शक्यता आहे. प्रलंबित असलेली घरगुती कामे आज पूर्ण झाल्याने मन हलके होईल. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे.

कुंभ राशी: कठीण परिस्थितीतही आज तुम्हाला कुठून ना कुठून मोठा दिलासा किंवा मदत नक्की मिळेल. शेअर बाजार किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाचा ताण असला तरी संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचा ताण नाहीसा होईल आणि मन प्रसन्न राहील.

मीन राशी: प्रियजनांचा आणि कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यास मदत करेल. अनपेक्षितपणे आर्थिक लाभ किंवा मदत मिळाल्यामुळे तुमचे रखडलेले प्रश्न सुटतील. नवीन लोकांशी होणाऱ्या भेटीगाठी भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरतील. आरोग्याची काळजी घ्या आणि कामासोबतच विश्रांतीसाठीही वेळ काढा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

SCROLL FOR NEXT