horoscope today Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: भावनिक निर्णय टाळा, नवे काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ; 'या' राशीच्या लोकांसाठी विशेष ठरतोय आजचा दिवस

daily horoscope predictions: वाचा तुमच्या राशीचे भविष्य, ०५ डिसेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: कामातील अडचणी आज हळूहळू दूर होतील. तुम्हाला एखादी नवीन योजना सुचेल जी पुढे मोठा फायदा देईल. कुटुंबात एकत्रितपणा वाढेल.

वृषभ: आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या सुखद असेल. पैशाच्या बाबतीत सकारात्मक हालचाल. एखादा जुना अडथळा दूर होईल. आरोग्य स्थिर राहील.

मिथुन: आज तुमच्यातील बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती विशेष चमकेल. नवे काम सुरू करण्यासाठी योग्य दिवस. मित्रांकडून मदत मिळेल.

कर्क: भावनिक निर्णय टाळा. शांत राहून घेतलेली कृती तुम्हाला समस्यांपासून दूर ठेवेल. कुटुंबातील चर्चांमध्ये तुमचे मत महत्वाचे ठरेल.

सिंह: कामात वेगाने प्रगती होईल. तुमच्या नेतृत्वगुणांना मान्यता मिळेल. पण अतिउत्साहातून कोणतीही वचनबद्धता करू नका.

कन्या: आर्थिक बाबतीत थोडी खबरदारी घ्या. खर्च वाढण्याची शक्यता. कामात संयम आवश्यक. एखादे जुने काम पूर्ण होण्याची शक्यता.

तूळ: तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतो. नातेसंबंधात गोडवा वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात नवी संधी येईल.

वृश्चिक: शत्रूंवर वरचढ राहाल. कठीण परिस्थितीत तुमचा निर्णय योग्य ठरेल. घरातील चर्चा तुमच्या बाजूने फिरेल.

धनु: विद्यार्थ्यांसाठी आणि प्रवास इच्छुकांसाठी शुभ दिवस. तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्ती भेटू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल.

मकर: कामात कौतुक मिळेल. अडकलेले काम मार्गी लागेल. पण अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. आरोग्याची थोडी काळजी घ्या.

कुंभ: सर्जनशीलतेला चालना मिळेल. तुमच्या कल्पना लोकांना आवडतील. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. नातेसंबंधात मोकळेपणा वाढेल.

मीन: मन:शांती मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल. कामात लक्ष केंद्रित केल्यास उत्तम परिणाम. आरोग्य सुधारेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indigo Flight Status: असुविधा के लिए खेद है! इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच, गोव्यात 11 उड्डाणे रद्द, कंपनीने मागितली माफी

Goa Politics: खरी कुजबुज; मनोजचा ‘सोशल’ संताप

Super Cup 2025: गतविजेत्या FC गोवाची सुपर कपमध्ये मुसंडी! मुंबई सिटीला नमविले, अंतिम फेरीत पडणार ईस्ट बंगालशी गाठ

Goa Tourism: इस्रायली पर्यटकांसाठी 'गोवा' सर्वाधिक लोकप्रिय! वाणिज्य दूत हॉफमन यांची स्तुतीसुमने; थेट विमानसेवेबाबत मंत्री खंवटेंशी चर्चा

Goa Politics: गोवा भाजपला हवेत ‘होय बा’! बाबूंचा घरचा आहेर; तोरसेतून केली कांबळींची उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT