आज भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी असून शनिवारचा दिवस आहे. ही तिथी आज रात्री १.४२ वाजेपर्यंत राहील. आज अनंत चतुर्दशी व्रत साजरे केले जाईल. रात्री १०.५६ वाजेपर्यंत रवि योग आणि धनिष्ठा नक्षत्र राहील. तसेच पंचकाची सुरुवात आजपासून होत आहे. उद्या, म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. पाहूया, आजचा दिवस बारा राशींना काय परिणाम देतो.
मेष: प्रगतीचा दिवस. व्यापारात मोठा लाभ होईल. घरगुती कार्यक्रमामुळे वेळापत्रक बदलू शकेल. नात्यांतील गैरसमज दूर होतील. आरोग्य चांगले राहील.
वृषभ: सामान्य दिवस. व्यावसायिक बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. कौटुंबिक नातेसंबंध सुधारतील.
मिथुन: कामात मन लागेल. व्यापारी वर्गासाठी महत्त्वाच्या मीटिंग्ज फायद्याच्या ठरतील. मित्रांसोबत सहल होऊ शकते. आईचे आरोग्य सुधारेल.
कर्क: नोकरीत प्रगती आणि उत्पन्नवाढ. मुलांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आर्थिक बाबतीत अति विश्वास टाळा. धार्मिक प्रवास होऊ शकतो.
सिंह: अडचणी दूर होतील. धार्मिक अनुष्ठानाची योजना बनेल. जुनी योजना पुन्हा सुरू होईल. दांपत्य जीवन आनंदी राहील.
कन्या: प्रलंबित कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये चर्चासत्र होईल. मल्टिनॅशनलमध्ये कार्यरत लोकांना बढतीची शक्यता. कलात्मक कार्यात रस वाढेल.
तुला: व्यवसायात धनलाभ. राजकीय संबंधांमुळे फायदा. लेखकांसाठी आज प्रेरणादायी दिवस. धार्मिक स्थळी जाऊन मानसिक शांती मिळेल.
वृश्चिक: नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मेहनतीमुळे इतरांना प्रेरणा द्याल. आरोग्याबाबत काळजी घ्या.
धनु: धनलाभाचे अनेक अवसर. मित्रांच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन कौशल्य शिकाल. महिलांसाठी आजचा दिवस विशेष.
मकर: कामात मन लावल्याने चांगले निकाल मिळतील. जीवनसाथीसोबत शॉपिंग किंवा सहल होईल. जबाबदाऱ्या टाळू नका. आरोग्याविषयी सतर्क राहा.
कुंभ: व्यापारातील अडथळे दूर होतील. दांपत्य जीवन आनंदी राहील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होईल. जुन्या मित्राशी भेट आनंद देईल.
मीन: सामाजिक कार्यात सहभागाने मान-सन्मान वाढेल. घर सजावटीची कामे होतील. रिअल इस्टेट क्षेत्रात प्रगती. प्रवासाचे योग.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.