Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Nehara Goa Cottage: केळशी येथील भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्या मालकीच्या कॉटेज प्रकल्पाला आता गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट एजन्सीकडून (जीसीझेडएमए) परवानगी मिळाली आहे.
Nehara Cottage CRZ Approval
Nehara Cottage CRZ ApprovalDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: केळशी येथील भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्या मालकीच्या कॉटेज प्रकल्पाला आता गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट एजन्सीकडून (जीसीझेडएमए) परवानगी मिळाली आहे. मात्र, केळशी पंचायतीने प्रकल्प बांधकामासाठी परवानगी दिलेली नसून येत्या ११ सप्टेंबरला पंचायत, तक्रारदार आणि नेहरा यांचे प्रतिनिधी जागेची पाहणी करणार आहेत.

गेल्या काही वर्षांत राज्यात सिलेब्रिटींनी जमिनी विकत घेण्याचे आणि त्यातून वाद निर्माण होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याने केळशी येथे किनाऱ्याजवळ काही चौरस मीटर जमीन विकत घेतली आहे.

Nehara Cottage CRZ Approval
Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

गेल्यावर्षी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी दगड टाकून रस्ताही करण्यात आला. या विषयावरून ग्रामसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

आता जीसीझेडएमए या संस्थेने नेहरा यांच्या जागेत एक घर आणि ९ लाकडी कॉटेज उभारण्यास परवानगी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तरीही, केळशी पंचायतीने या प्रकल्पाला बांधकामाची परवानगी दिलेली नाही.

Nehara Cottage CRZ Approval
Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी केळशी पंचायतीने तक्रारदार, क्रिकेटर आशिष नेहराचे प्रतिनिधी आणि पंचायत सदस्यांसोबत ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जागेची पाहणी ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com