रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Damu Naik Mission 27: भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी आपला वाढदिवस हरवळे, साखळी येथील श्री देव रुद्रेश्वराचे दर्शन घेऊन आणि अभिषेक करून साजरा केला
BJP campaign Goa
BJP campaign GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Damu Naik Birthday Celebration: भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी आपला वाढदिवस हरवळे, साखळी येथील श्री देव रुद्रेश्वराचे दर्शन घेऊन आणि अभिषेक करून साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, तसेच अनेक माजी मंत्री आणि आमदार उपस्थित होते. या सर्वांनी नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवस साजरा करण्याचा वेगळा संकल्प

यापूर्वी दरवर्षी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे दामोदर नाईक यांनी यंदा जबाबदारी वाढल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे तो मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी केवळ आपल्यासाठी नाही तर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला '२७ जागा' मिळवून देण्याचा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी श्री रुद्रेश्वराकडे प्रार्थना केली.

त्याचबरोबर, गोव्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठीही त्यांनी देवाकडे साकडे घातले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली विकसित भारत आणि स्वयंपूर्ण गोवा ही मोहीम सध्या करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. सोबतच अशा प्रकारे वाढिवस साजरा करण्याची त्यांची पहिलीच वेळ असल्याचं सांगत त्यांनी हा वाढदिवस जबाबदरी देखील घेऊन आल्याचं सांगितलं.

BJP campaign Goa
Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दामोदर नाईक यांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, "दामोदर नाईक यांचे २७ जागा जिंकण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप सरकारला गोव्याचा विकास करण्याची संधी पुन्हा मिळावी." मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आगामी निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com