Hindu New Year: Dainik Gomantak
Horoscope

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

Lucky Zodiac Signs: भारतीय कालसंस्कृती आणि ज्योतिषशास्त्राच्या परंपरेनुसार येणारे हिंदू नववर्ष म्हणजेच 'विक्रम संवत 2083' गुरुवार, 19 मार्च 2026 पासून सुरु होत आहे.

Manish Jadhav

Hindu New Year 2083: भारतीय कालसंस्कृती आणि ज्योतिषशास्त्राच्या परंपरेनुसार येणारे हिंदू नववर्ष म्हणजेच 'विक्रम संवत 2083' गुरुवार, 19 मार्च 2026 पासून सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, ज्या दिवशी नववर्षाची सुरुवात होते, त्या वाराचा स्वामी ग्रह हा त्या वर्षाचा 'राजा' मानला जातो. यंदा नववर्षाची सुरुवात गुरुवारी होत असल्याने, देवगुरु बृहस्पती हे या वर्षाचे राजा असणार आहेत.

त्याचप्रमाणे, ज्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो (मेष संक्रांती), त्या वाराचा स्वामी त्या वर्षाचा 'मंत्री' असतो. यंदा मेष संक्रांती मंगळवारी येत असल्याने, मंगळ ग्रह या वर्षाचा मंत्री असेल. गुरुसारखा सात्विक, विस्तारवादी ग्रह राजा आणि मंगळासारखा साहसी, ऊर्जेचा ग्रह मंत्री असणे हा एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग मानला जातो. या ग्रहांच्या शुभ संयोगाचा चार विशिष्ट राशींच्या जीवनावर अत्यंत सकारात्मक आणि प्रगतीकारक प्रभाव पडणार आहे.

या नववर्षात मेष राशीच्या व्यक्तींसाठी आशेचे नवीन किरण घेऊन येणारा काळ असेल. देवगुरु बृहस्पती राजा असल्याने तुमच्या आयुष्यात मोठी स्थिरता येईल आणि रखडलेली कामे पुन्हा एकदा मार्गी लागतील. आर्थिक आघाडीवर सुधारणा होण्याची दाट शक्यता असून उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टाचे चीज होऊन पदोन्नती (Promotion) किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे योग आहेत. मंगळ मंत्री असल्याने तुमच्या निर्णयक्षमतेत वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही धाडसी पावले उचलू शकाल. कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील आणि नात्यांमध्ये सुसंवाद वाढेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी विक्रम संवत 2083 हा मानसन्मानाचा आणि प्रगतीचा काळ ठरेल. बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या भाग्याची साथ वाढवेल, ज्यामुळे करिअरमध्ये नवीन आणि सुवर्ण संधी उपलब्ध होतील. जर तुम्ही नोकरी (Job) बदलण्याचा विचार करत असाल, तर हे वर्ष त्यासाठी अतिशय पूरक आहे. व्यापारात नवीन लोकांशी होणारे संपर्क फायद्याचे ठरतील. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल, ज्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. भविष्यातील योजनांसाठी भक्कम पाया रचण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे.

वृश्चिक राशीसाठी हे वर्ष सकारात्मक बदलांचे संकेत देत आहे. बृहस्पतीची कृपा तुमच्या वैचारिक प्रगतीला चालना देईल, ज्यामुळे तुम्ही नवीन दिशा शोधू शकाल. आर्थिक परिस्थिती हळूहळू पण ठामपणे सुधारताना दिसेल. विशेषतः या राशीचा स्वामी मंगळ स्वतः वर्षाचा मंत्री असल्याने, तुमच्यातील साहस आणि ऊर्जा कमालीची असेल. कोणत्याही कठीण प्रसंगाला तुम्ही धीराने सामोरे जाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी मोठे यश मिळू शकते. मित्र आणि कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्यास मदत करेल.

धनु राशीच्या व्यक्तींसाठी हे नववर्ष स्वप्नपूर्तीचे वर्ष ठरु शकते. गुरुच्या प्रभावामुळे तुमच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठा फायदा होईल. वरिष्ठांचा तुमच्यावरचा विश्वास वाढल्याने नवीन अधिकार मिळतील. व्यापारात वृद्धी होईल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. मंगळाच्या प्रभावामुळे कार्यक्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने संकटांवर मात करु शकाल. घरगुती जीवनात सुखाची लाट येईल आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या योजना पूर्णत्वास जातील. एकूणच, राजा गुरु आणि मंत्री मंगळ या जोडीचा हा संयोग या चार राशींच्या आयुष्यात भरभराटीचे नवीन पर्व सुरु करणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT